शहरं
Join us  
Trending Stories
1
Navneet Rana : नवनीत राणांच्या प्रचारसभेत मोठा राडा; अंगावर खुर्च्या फेकण्याचा प्रयत्न! 
2
"उद्या ते असेही म्हणतील की, मी जातगणनेस विरोध करतो"; राहुल गांधींचे भाजपवर टीकास्त्र
3
भाजपने अनेक राज्यांत भ्रष्टाचारातून सत्ता मिळवली, मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचा मोठा आरोप
4
Mumbadevi Vidhan Sabha 2024: शायना एन.सी. विरुद्ध अमीन पटेल; गड राखण्याचे काँग्रेससमोर आव्हान! 
5
Maharashtra Election 2024 Live Updates: 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर अजितदादांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला
6
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
7
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
8
इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्या निवासस्थानावर बॉम्बहल्ला
9
"मराठा समाजाला आरक्षण आमच्या सरकारनेच दिले"; रावसाहेब दानवे यांची विशेष मुलाखत   
10
Maharashtra Vidhan Sabha 2024: 'भाजपच्या बोलण्यातून दिसतेय भेदरलेली स्थिती'; सचिन पायलट यांचा दावा
11
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
12
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
13
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
14
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
15
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
16
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
17
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
18
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
19
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
20
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत

रेमडेसिवीर वापरू नका, डब्ल्यूएचओची पुन्हा सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2020 6:09 AM

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाने स्पष्ट केले आहे की, रेमडेसिवीर हे औषध घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णावर काहीही विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत तसेच यामुळे मृत्यू टाळता येतो असेही दिसून आलेले नाही. 

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : रेमडेसिवीर या औषधाचा वापर कोरोना रुग्णांवर केला जाऊ नये, अशी स्पष्ट सूचना जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे. रेमडेसिवीरसह पाच अन्य औषधांवर महिनाभर विविध चाचण्या केल्यानंतर हाती आलेल्या माहितीच्या आधारे जागतिक आरोग्य संघटना या निष्कर्षापर्यंत पोहचली आहे. भारतात रेमडेसिवीरचा वापर कोरोना संसर्गाची मध्यम तसेच गंभीर लक्षणे आढळत असलेल्या रुग्णांवर केला जात आहे.

जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ज्ञांच्या पथकाने स्पष्ट केले आहे की, रेमडेसिवीर हे औषध घेतल्याने कोरोनाबाधित रुग्णावर काहीही विशेष परिणाम दिसून आलेले नाहीत तसेच यामुळे मृत्यू टाळता येतो असेही दिसून आलेले नाही. 

तज्ज्ञांनी दिलेला अहवाल गुरुवारी ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित करण्यात आला. कोरोना साथीच्या सुरुवातीपासून जगभराचे लक्ष या औषधाकडे वेधले गेले होते. अनेक डॉक्टरांनीही हे औषध कोरोनावरील उपचारासाठी चांगले असल्याचा दावा केला होता. (वृत्तसंस्था)

टॅग्स :World health organisationजागतिक आरोग्य संघटनाcorona virusकोरोना वायरस बातम्या