ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि.7 - दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्या 'पंतप्रधान नरेंद्र मोदीं'संदर्भात केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा निषेध केला आहे. 'राहुल गांधी यांनी दलालीसारख्या शब्दांचा वापर करू नये, राजकीय मतभेद दूर करुन सर्जिकल स्ट्राईकच्या मुद्यावर आपल्याला लष्करातील जवानांसोबत उभे राहणे गरजेचं आहे', असं सांगत केजरीवाल राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा निषेध व्यक्त केला आहे. 'पंतप्रधान सुरक्षेच्या दृष्टीकोनातून जे काही पाऊल उचलत आहेत, त्यासाठी त्यांच्या बाजूने उभे राहणे गरजे आहे', असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.
आणखी बातम्या
I strongly condemn what Rahul Gandhi said about our jawans, this is a matter in which we all need to stand united: Arvind Kejriwal pic.twitter.com/0qXYoCEPzC— ANI (@ANI_news) October 7, 2016
Such words (dalali) should not have been used by Rahul Gandhi. These are the times for us unite & stand along army: Delhi CM Arvind Kejriwal— ANI (@ANI_news) October 7, 2016
राहुल गांधी यांनी सर्जिकल स्ट्राईकवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करत 'केंद्रातील भाजप सरकार हे जवानांच्या रक्ताची दलाली करत आहे', असे वादग्रस्त वक्तव्य केले होते. यावरुन राहुल गांधींवर चौफेर टीका होत आहे. दरम्यान,यावर राहुल यांनी ट्विटरवर स्पष्टीकरण दिले आहे. 'माझा सर्जिकल स्ट्राईकला पूर्णपणे पाठिंबा आहे. मी आधीच हे स्पष्ट केले आहे. पण राजकीय पोस्टर्स भारतीय लष्कराचा वापर करण्याला माझा पाठिंबा नाही. अशा प्रकारे प्रसिद्धी मिळवण्याला माझा पूर्ण विरोध आहे', असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे.
I fully support the surgical strikes and I have said so unequivocally, but I will not support using..(1/2)— Office of RG (@OfficeOfRG) October 7, 2016
the Indian Army in political posters and propaganda all across the country (2/2)— Office of RG (@OfficeOfRG) October 7, 2016