शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: मविआतील तिढा सुटला?; काँग्रेस १०० जागा लढणार, ठाकरे-पवारांच्या वाट्याला किती?
2
"मुंबई विद्यापीठाचा कारभार म्हणजे 'फक्त' रात्रीस खेळ चाले"; पुन्हा सिनेट निवडणूक रद्द
3
तणाव वाढला! जरांगेंच्या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी बीड, धाराशिवमध्ये बंदची हाक
4
सलमान खानने संगीता बिजलानीला दिला धोका, या अभिनेत्रीसोबत अभिनेत्याला पकडलं होतं रंगेहाथ, इतक्या वर्षांनंतर झाला खुलासा
5
डीके शिवकुमारांची खेळी, JDS ला मोठा धक्का; पोटनिवडणुकीपूर्वी १३ नेत्यांनी साथ सोडली
6
तिरुपतीच्या लाडूंच्या विक्रीतून वर्षांला ५०० कोटींचा महसूल; पाहा किती जुना आहे 'मिठा प्रसादम'चा इतिहास
7
शंभुराज देसाईंचा मध्यरात्री फोन अन् मनोज जरांगेंनी घेतले सलाईनद्वारे उपचार
8
टुकडे टुकडे गँग, अर्बन नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत; वर्धेतील पीएम विश्वकर्मा योजना वर्षपूर्ती सोहळ्यात मोदींचा घणाघात
9
जबरदस्त क्रेझ... दर तीन मिनिटांना एका iPhone 16 ची विक्री; Blinkit आणि BigBasket वरही ग्राहकांची रांग
10
"५० खोक्यांचा मुकूट, विरोधी पक्ष फोडाया बुद्धी..."; नवरा माझा नवसाचा २ च्या भारूडाची जोरदार चर्चा
11
"राजकारण असा धंदा जिथे सामान्यांच्या शिव्या..."; देवेंद्र फडणवीसांनी व्यक्त केली भावना
12
भाजपच्या सभेतील माणसे काँग्रेसच्या सभेतही दिसतील! विविध कंपन्यांकडून गर्दी जमविण्याची हमी
13
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: कोणत्याही प्रकारे अविचारी निर्णय करू नका
14
ठाकरे गटाचा दसरा मेळावा यंदाही शिवाजी पार्कात? शिंदेसेनेकडून मैदानासाठी अर्ज नाही
15
अटल सेतूवर ट्रॅफिक नियम तोडाल तर, सावधान... वाहतुकीवर आयटीएमएसची करडी नजर
16
तिरुपतीचे तूप तापले! स्वस्त तूपखरेदीमुळे मंदिराच्या लाडूत भेसळ झाल्याचा आराेप
17
सुधारित आयटी नियम घटनाबाह्य, मुंबई उच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला दणका
18
निवडणुकीपूर्वी दोघांनाही नवीन चिन्हे द्या; राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटातर्फे सर्वोच्च न्यायालयात याचिका
19
अमेरिकेत भेटलेल्या तरुणाच्या घरी पहाटेच पोहोचले राहुल गांधी; भारतातील बेरोजगारीला कंटाळून तरुणाने अमेरिकेत केली होती घुसखोरी
20
मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; उद्या दोन्ही मार्गावर मेगाब्लॉक, वाचा सविस्तर

यूपीच्या भविष्याची नासाडी करू नका - मोदींची टीका

By admin | Published: February 28, 2017 4:24 AM

उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले.

महू (उत्तर प्रदेश) : भारतीय जनता पक्षाला पराभूत करण्यासाठी समाजवादी पक्ष, बहुजन समाज पक्ष आणि काँग्रेसने काय वाट्टेल ते करावे, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नये, असे उद्गार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी येथे काढले. ते निवडणूक प्रचार सभेत बोलत होते. उत्तर प्रदेशात आपल्याला बहुमत मिळत नसेल, तर ते कोणालाच मिळू नये, असा प्रयत्न बसपा आणि सपा यांनी चालविला आहे, पण भाजपाला या राज्यात स्पष्ट बहुमत मिळेल आणि आमचेच सरकार इथे स्थापन होईल, असा दावाही मोदी यांनी केला. मोदी म्हणाले की, ‘भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका. समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे,’ असे सांगून मोदी म्हणाले की, ‘अनेक वर्षे राज्याची उपेक्षा करणाऱ्या काँग्रेस, समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाला मतदारांनी शिक्षा करावी. आमचा पक्ष उत्तर प्रदेशात सत्तेवर येईल, त्या वेळी आघाडीतील आमच्या मित्र पक्षांना भाजपाच्या सरकारमध्ये सहभागी करून घेतले जाईल,’ असे नरेंद्र मोदी म्हणाले. ‘पंडित जवाहरलाल नेहरू यांनी पंतप्रधान असताना पूर्व उत्तर प्रदेशच्या विकासासाठी समिती स्थापन केली होती. तिचा अहवाल ५० वर्षे पडून होता. काँग्रेसच्या सरकारांनी या ५0 वर्षांत काहीच केले नाही. आता आम्ही त्याच्यावर काम सुरू केले आहे,’ असा दावा मोदी यांनी केला. ‘पूर्व उत्तर प्रदेशला पुरेसे पाणी आणि वीज यांचा पुरवठा केला जाईल आणि या मागास राहिलेल्या भागाची आन, बान आणि शान पुन्हा मिळवून दिली जाईल,’ असे आश्वासनही त्यांनी दिले. रविवारी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी मोदी यांनी केलेल्या दिवाळी-रमझान भेदभाव वाक्याबद्दल जोरदार टीका केली होती. >मुस्लिमांना उमेदवारी द्यायला हवी होतीउत्तर प्रदेशात भारतीय जनता पक्षाने मुस्लिमांना उमेदवारी देणे आवश्यक होते, असे प्रतिपादन भाजपाचे नेते आणि केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नकवी यांनी येथे केले. उत्तर प्रदेशात बसपा आणि सपाने अनेक मुस्लीम उमेदवार दिले असून, तेथील मुस्लिमांचे प्रमाणही १९ टक्के आहे.पाचव्या टप्प्यात ५७ टक्के मतदानउत्तर प्रदेशात पाचव्या टप्प्यासाठी सोमवारी शांततेत मतदान पार पडले. या टप्प्यात पाच वाजेपर्यंत सुमारे ५७.३६ टक्के मतदान झाल्याचे सांगण्यात आले. मतदान संपण्याच्या वेळी अनेक केंद्रांसमोर मतदारांच्या रांगा होत्या. ते पाहता, ६0 टक्के मतदान होईल, असा अंदाज आहे. मतदानाचे दोन टप्पे शिल्लक आहेत. आधीच्या चार टप्प्यांत ६१ ते ६५ टक्के मतदान झाले आहे. >समाजवादी पक्ष-काँग्रेस यांची मैत्री म्हणजे बुडते जहाज आहे. भाजपाला पराभूत करण्यासाठी तुम्हाला जे जे शक्य आहे ते करा, परंतु उत्तर प्रदेशच्या भविष्याची नासाडी करू नका.- नरेंद्र मोदी, पंतप्रधान