लोकमत न्यूज नेटवर्क : तिसरी लाट येणार की नाही याविषयी साशंकता असली तरी कोरोनापासून बचावासाठी सध्या लस हाच उपाय आहे. पण, लसीमुळे किती बचाव होतो, कोणती लस घ्यावी असे अनेक प्रश्न अजूनही मनात आहेत. त्याची उत्तरे आरोग्य मंत्रालयाने दिली आहेत. जाणून घेऊ दोन डोस घेतल्यानंतर धोका कमी होतो का?
संशोधन काय सांगते ?
आरोग्य खात्याने एप्रिल आणि ऑगस्ट या काळातील डेटावरून संशोधन केले. दुसऱ्या लाटेत म्हणजेच एप्रिल ते मे या काळात मृत्यू झालेल्यांमध्ये एकही डोस न घेणऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक होते.
ही जनता सुरक्षित
१७.५ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. सरकारच्या संशोधनाचा निष्कर्ष ग्राह्य धरल्यास या १७.५ कोटी लोकांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी आहे. ५६ कोटी लोकांना आतापर्यंत लसीचा पहिला डोस देण्यात आला आहे. यांनाही जवळपास ९६ टक्के सुरक्षा मिळत आहे.
महाराष्ट्रात सर्वाधिक दिला गेला दुसरा डोस
दुसरा डोस घेणाऱ्यांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक आहे. राज्यात १.८५ कोटी लोकांना दुसरा डोस देण्यात आला आहे. उत्तर प्रदेश दुसऱ्या स्थानी असून, तेथे दुसरा डोस पूर्ण करणाऱ्यांची संख्या १.४५ कोटी आहे.
आरोग्य मंत्रालय काय म्हणाले?
लसीचे दोन्ही डोस पूर्ण करणाऱ्यांना कोरोनाने मृत्यू होण्याचा धोका ९७ टक्के कमी असतो.