नवी दिल्ली : मेफ्टाल या वेदनाशामक गोळीच्या दुष्परिणामांबद्दल वैद्यकीय व्यावसायिक व रुग्णांनी सतर्कता बाळगावी, असा इशारा इंडियन फार्माकोपिया कमिशनने (आयपीसी) दिला आहे. औषधातील मेफेनैमिक अॅसिड हे विविध प्रकारच्या अँलर्जी वाढण्यास तसेच शरीरांतर्गत अवयवांवर गंभीर परिणाम करतो, असा इशारा देण्यात आला आहे.
मेफ्टालच्या दुष्परिणामांचा फार्माकोव्हिजिलन्स प्रोग्रॅम ऑफ इंडियाने अभ्यास केला. डॉक्टर तसेच रुग्णांनीही बारीक लक्ष ठेवावे, असा इशारा आयपीसीने दिला होता.
कशासाठी होतो वापर?मासिक पाळीच्या वेळेस होणाऱ्या वेदना तसेच संधिवातामुळे होणारा त्रास कमी करण्यासाठी, तसेच ऑस्टियोआर्थरायटिस, डिसमेनोरिया, सौम्य ते मध्यम वेदना, जळजळ, ताप आणि दातदुखी या समस्यांचा त्रास दूर होण्यासाठी मेफ्टाल गोळी देतात.
भारतात मोठ्या प्रमाणात वापरमेफ्टाल ही औषधी प्रिस्क्रिप्शनद्वारे दिले जाणारे औषध असतानाही ती भारत सर्वत्र मोठ्या प्रमाणात वापरली जाते. प्रामुख्याने ही औषधी मेफ्टाल, मेफकाइंड, मेफानॉर्म, तसेच आयबुक्लिन पी या नावानेही विक्री केली जाते.