नवी दिल्ली : आई-वडील आणि मुलगा किंवा मुलगी या त्रिकोणी कुटुंब व्यवस्थेचा मोठा परिणाम सध्या पहायला मिळत आहे. मूल रडले की त्याला उचलून घेण्यास कुणाकडे वेळ नाही. त्यामुळे मुलाचे रडणे थांबविण्यासाठी आपण त्याच्या हातात मोबाइल देतो. मात्र, हाच मोबाइल मुलांचे आयुष्य उद्ध्वस्त करत आहे. मोबाइलमुळे मुलांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची क्षमता कमी होत आहे. ते रील्समधून मातृभाषा सोडून जपानी आणि चिनी भाषा शिकत आहेत. डॉक्टर आता रील्सच्या शैलीने त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करत आहेत. जास्त स्क्रीन टाइममुळे मुले ‘ऑटिझम’ आजाराला बळी पडत आहेत. रील्स बघत असल्याने आई-वडिलांना त्यांची भाषा समजण्यास अडचण निर्माण होत आहे.
घटना काय?
एका नोकरदार जोडप्याने आपल्या दीड वर्षाच्या मुलासाठी घरात नानी ठेवली होती. मुलगा रडायला लागला की ती त्याला मोबाइल देई. ६-७ तास तो मोबाइल बघत असे.
मूल ४ वर्षांचे आहे, पण त्याला हिंदी बोलता येत नाही. रीलमध्ये येत असलेल्या भाषेप्रमाणे तो चिनी-जपानी भाषेच्या शैलीमध्ये संवाद साधत आहे.
मुलांवर काय परिणाम?
nमानसिक आणि शारीरिक विकास थांबतो
nमुलांचा विकास पूर्णपणे होण्यात अडथळे
nशारीरिक विकासासाठी आवश्यक असणारे खेळही तो खेळू शकत नाही.
nत्याला सामाजिक, कौटुंबिक भावना समजत नाहीत.
तज्ज्ञ म्हणतात...
स्क्रीन टाइम वाढल्याने ७ वर्षांपर्यंतच्या मुलांना ऑटिझमचा त्रास होत आहे. त्यांच्यात भाषेचा विकास होत नाही. पडद्यावर दिसणाऱ्या भाषेतील शब्द ते बोलू लागतात. अशी अनेक प्रकरणे समोर येत आहेत.
- डॉ. ओ. पी. रायचंदानी,
मानसोपचार तज्ज्ञ