मुंबई : तामिळनाडूचे माजी मुख्यमंत्री आणि दक्षिण भारतातील राजकारणात आपला अमिट ठसा निर्माण करणारे एम. करुणानिधी यांचे आयुष्य अनेक चढ उतारांनी भरलेले होते. त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचे दहा मुद्दे खालीलप्रमाणे...
1) एम. करुणानिधी यांचा जन्म थिरुवरुर जिल्ह्यामध्ये एका खेड्यात 3 जून 1924 रोजी झाला.2) करुणानिधी यांनी तमिळ सिनेसृष्टीमध्ये कथालेखनाचे काम सुरु केले.3) द्रविड मुन्नेत्र कळघम पक्षाची स्थापना करणाऱ्या सदस्यांपैकी ते एक होते.4) 1957 साली त्यांनी पहिल्यांदा तमिळनाडू विधानसभेची निवडणूक लढवली.5) करुणानिधी यांनी 12 वेळा विधानसभेची निवडणूक लढविली आणि त्या सर्व निवडणूका ते जिंकले.6) एम. करुणानिधी तामिळनाडूचे पाच वेळा मुख्यमंत्री झाले.7) चित्रपटांप्रमाणे त्यांनी अनेक कथा, नाटकं, कविता लिहिल्या आहेत.8) करुणानिधी यांना कलैग्नार नावाने ओळखले जाते.9) करुणानिधी यांचा राजकीय वारसा त्यांचा मुलगा स्टॅलिन व मुलगी कनिमोळी यांच्याकडे आहे.10) करुणानिधी यांनी द्रमुक पक्षाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी सलग 50 वर्षे सांभाळली.