शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
2
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
3
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
4
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
5
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
6
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
7
TATA IPL Auction 2025 Live: इशान किशन हैदराबादच्या ताफ्यात; SRH ने लावली 11.25 कोटींची बोली...
8
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
9
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
10
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
11
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
12
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
13
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
14
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
15
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
16
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
17
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...
18
IPL Auction 2025: युजवेंद्र चहलला १७७ % 'अप्रेझल'! बनला सर्वात महागडा स्पिनर, पंजाब किंग्जने घेतलं संघात
19
"काय झालं हेच आम्हाला कळेना...;" निवडणूक निकालाच्या दुसऱ्या दिवशी काँग्रेसनं सांगितला पुढचा प्लॅन
20
IPL Auction 2025: व्वा पंत... मानलं ! अवघ्या १५ मिनिटात इतिहास बदलला, रिषभ सर्वात महागडा खेळाडू ठरला!!

व्हॉट्सअ‍ॅपचे हे फीचर्स तुम्हाला माहित आहेत का?

By admin | Published: June 05, 2017 1:59 PM

व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अबालवृधांच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलेले व्हॉट्सअ‍ॅप कायमच आपल्या यूझर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत असतं

ऑनलाइन लोकमतमुंबई, दि. 5 - व्हॉट्सअ‍ॅप हे जगातील सर्वात लोकप्रिय इन्स्टंट मेसेजिंग अ‍ॅप आहे. अबालवृधांच्या जिवनाचा अविभाज्य भाग बनलेले व्हॉट्सअ‍ॅप कायमच आपल्या यूझर्ससाठी नवनवे फीचर्स घेऊन येत असतं. भारतामध्ये इंटरनेट ट्रेंड्सवर केलेल्या एका सर्वेनुसार या वर्षी प्ले स्टोरवरुन सर्वात जास्त डाउनलोड केलल्या अ‍ॅपमध्ये व्हॉट्स अ‍ॅप प्रथम क्रमांकावर आहे. प्रत्येक वेळी आपल्या ग्राहकांसाठी काही तरी नवे फिचर्स घेऊन येतं असल्यामुळे व्हॉट्स अ‍ॅप लोकप्रिय आहे. नुकतेच व्हॉट्सअ‍ॅपने नवे पाच फिचर्स अपडेट केले आहेत. जर तुम्ही आपले व्हॉट्सअ‍ॅप अपडेट केले असेल तर ते तुम्हाला पहावयास मिळेल. कोणते आहेत हे पाच फिचर्स जाणून घेऊयात. चॅट्सला पिन करनं -खूप दिवसांपासून चर्चेत असलेलं हे फिचर्स नुकतंच अपडेट झालं आहे. पिन चॅट्समध्ये तुम्ही आपल्या जवळच्या व्यक्ती किंवा ग्रुप चॅट शीर्षस्थानी ठेवता येतं. म्हणजे त्या व्यक्तीचा मेसेज आल्यास आपल्याला पहिल्यांदा दिसेल. ही सुविधा फक्त तीन चॅट्स (वैयक्तिक आणि गट चॅट्स दोन्हीसह) निवडण्याची परवानगी देते, जेणेकरुन ते संभाषणांच्या सूचीत गमावले जाणार नाहीत. चॅट पिन करण्यासाठी, वापरकर्त्यांना त्यावर जास्त वेळ लावावा लागेल आणि नंतर शीर्ष पट्टीवर दिसणाऱ्या पिन चिन्हावर टॅप करा. तसेच इतर चिन्ह आहेत, जे वापरणे, हटविणे, म्यूट आणि संग्रह यासारख्या पर्यायांमध्ये प्रवेश करण्यासाठी वापरले जाऊ शकतात. चॅट अनपिन करण्यासाठी समान पद्धत वापरली जाऊ शकते. वापरकर्त्यांना एकदा गप्पा पुन्हा एकदा दाबा आणि पिन केलेल्या गप्पा अनपिन करण्यासाठी शीर्षस्थानी समान पिन चिन्हावर टॅप करा. आणखी वाचा :  डिलीट होता होईना व्हॉट्स अॅपचे मेसेज

टू-स्टेप ऑथेंटिकेशन फीचर२ स्टेप Authentication : या पर्यायमुळे व्हॉटसअ‍ॅप अधिक सुरक्षित होणार असून ह्या सुविधेत तुम्ही तुमचा फोन क्रमांक देऊन ठेवायचा. आणि सोबत एक पिन जोडायचा. व्हॉटसअ‍ॅप ठराविक कालावधीनानातर तुम्हाला हा पिन विचारेल ज्यामुळे दुसर्‍या कोना तुमचे संदेश वाचने वाघ्द होईल आणि यामुळे दुसर्‍या फोनवर परवानगीशिवाय (दिलेल्या पिनशिवाय) व्हॉटसअ‍ॅप इंस्टॉल करणे शक्य होणार नाही. यासाठी Menu > Settings > Account > 2 Step Verification मध्ये जाव्हॉट्सअ‍ॅपच्या जुन्या स्टेटसचं Come backव्हॉट्स अ‍ॅपने 8 वर्ष पूर्ण केल्यानिमित्त नवं स्टेटस फीचर आणलं होतं. नवीन स्टेटस फीचर लाँच केल्यानंतर व्हॉट्स अ‍ॅपने जुने स्टेटस फीचर हटवल. अनेकांनी जुने फीचर हटवण्यात आल्याबाबत नाराजी सूर व्यक्त केला होता. वापरकर्त्यांच्या नाराजीनंतर व्हॉट्स अ‍ॅपने जुने "टेक्स्ट स्टेटस फीचर" पुन्हा उपलब्ध केले. यामुळे युजर्संना पुन्हा "टेक्स्ट स्टेटस" ठेवता येऊ शकणार आहे. हे फीचर अबाऊट (About) आणि फोन क्रमांकाशेजारी दिसेल. नवीन "टेक्स्ट फीचर" जुन्या फीचरप्रमाणेच आहे. यात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. आणखी वाचा : एकाच फोनमध्ये सहज वापरा 2 व्हॉट्सअॅप

व्हिडिओ कॉलिंगसाठी वेगळे बटनया सेवेमध्ये तुम्ही तुमच्या एका मित्राला ज्याच्याकडे व्हॉटसअ‍ॅपचं नवं व्हर्जन आहे त्याला व्हिडिओ कॉल द्वारे संपर्क साधून छ्र५ी व्हिडिओ प्रमाणे बोलू आणि पाहू शकता. यासाठी व्हॉट्सअ‍ॅपने स्वतंत्र असे बटन दिले आहे. सुरुवातीला व्हाईस आणि व्हिडिओसाठी एकच बटन होतं मात्र अनेक लोक व्हिडिओ कॉलिंग वापरत असल्याचे पाहून स्वत्रंत बटन देण्यात आले. यापूर्वी आलेल्या इतर सेवा :GIF अ‍ॅनिमेशन पाठवण्याची सोय : GIF अ‍ॅनिमेशन ही एनेक चित्रे एकत्र मिळून तयार केलेली इमेज फाइल असते ज्यामुळे चित्रे/व्हिडिओ अ‍ॅनिमेशन रूपात दिसतात.  आणखी वाचा : खूशखबर ! व्हॉट्सअॅपच्या जुन्या स्टेटसचं Come Back

फोटो एडिट करण्याची सोय : यासाठी फोटो हा व्हॉटसअ‍ॅपमध्येच काढलेला असावा लागतो. या सेवेद्वारे आपण फोटोला क्रॉप, त्यावर अक्षरे लिहू शकतो इमोजी जोडू शकतो, विविध रंगांनी चित्रे काढू शकतोReply/Quote : एखाद्या ग्रुपमध्ये अनेकवेळा कोणता सदस्य कोणत्या सदस्याला उद्देशून बोलला हे समजत नाही त्यावेळी हे फीचर उपयोगी पडतं. समजा अ सदस्याने मेसेज पाठवला त्याला इ ला रिप्लाय देण्यासाठी अ च्या मेसेजला Long Press  (मेसेजवर जास्त वेळ टॅप करून ठेवा) वरती नवे पर्याय दिसू लागतील. त्यामधील डावीकडे जाणार्‍या बाणाचा पर्याय निवडा आणि इ त्याचा मेसेज अ टाइप करेल त्यामुळे इतर सदस्यांना संभ्रम निर्माण होत नाही. एखाद्या मेसेजला उद्देशून वापरत बोलण्यासाठी अतिशय उपयुक्त फीचर!  आणखी वाचा : व्हॉट्सअॅपवरही सुरू होणार जाहिरातींची कटकट? अनेक अ‍ॅडमिन : व्हॉटसअ‍ॅपच्या नव्या नियमांनुसार एका ग्रुपमध्ये एकापेक्षा अधिक अ‍ॅडमिन(ग्रुप प्रमुख)बनवता येतात. अ‍ॅडमिनला ग्रुपमध्ये नवीन सदस्य जोडणे, सध्याच्या सदस्यांना काढणे, इ. विशेषाधिकार असतात.लोकेशन शेअर : तुम्ही तुमच्या मित्रांसोबत तुमची सध्याची लोकेशन (जागा) पाठवू शकता. ज्यामध्ये तुम्ही गूगल मॅपवरुण लिंक देऊन शकता. जेणेकरून तुमचा पत्ता मित्रांना समजू शकेल. (Alert: ...तर तुमच्या फोनमधून व्हॉट्सअॅप होणार बंद)