लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : डॉक्टरांना मारहाण होण्याच्या घटना रोखण्यासाठी राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने अधिसूचना जारी केली आहे. अधिसूचनेनुसार, नोंदणीकृत वैद्यकीय प्रॅक्टिस (आरएमपी) करणाऱ्या डॉक्टरांशी शिविगाळ, गैरवर्तन, मारहाण करणाऱ्या रुग्णांना किंवा नातेवाइकांना उपचार करण्यास नकार देऊ शकतात.
रुग्णांच्या असभ्य वर्तनाविरोधात डॉक्टर राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाकडे तक्रार करू शकतात. त्यामुळे रुग्णाला उपचारासाठी इतरत्र पाठवले जाईल. हे नियम मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया (एमसीआय) च्या मेडिकल एथिक्स कोड २०२२ची जागा घेतील. रुग्णांना उपचार नाकारण्याचा अधिकार डॉक्टरांना प्रथमच मिळणार आहे.
रुग्णांच्या उपचाराशी संबंधित प्रत्येक गोष्ट त्यांच्या कुटुंबीयांनाही सांगावी. लागणारा खर्चही सांगावा लागेल. डॉक्टर आणि त्यांच्या कुटुंबीयांनी औषध कंपन्यांकडून कोणतीही भेटवस्तू, प्रवास सुविधा, सल्ला शुल्क किंवा मनोरंजन सुविधा स्वीकारणे टाळावे, असे अधिसूचनेमध्ये म्हटले आहे.
जबाबदारी घ्या...कोणत्या रुग्णावर उपचार करायचे, हे डॉक्टर ठरवू शकतात. डॉक्टरांची रुग्णांप्रती जबाबदारी आहे. त्यामुळे त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे टाळावे.