कौतुकास्पद! भयंकर अपघात, सर्जरीनंतरही हार नाही मानली, सायकलवरून 663 किमीची अयोध्या यात्रा केली
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2021 07:44 PM2021-01-28T19:44:32+5:302021-01-28T19:49:25+5:30
Jayant Agrawal : जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे.
नवी दिल्ली - प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात. याचच एक उत्तम उदाहरण पाहायला मिळालं आहे. डॉक्टरांनी हार मानली मात्र तरीही खचून न जाता अशक्य वाटणाऱ्या गोष्टी देखील शक्य करता येतात हे एका व्यक्तीने दाखवून दिलं आहे. मध्य प्रदेशमधील 38 वर्षीय जयंत अग्रवाल यांनी हेच सिद्ध केलं आहे. जबरदस्त इच्छशक्तीच्या जोरावर त्यांनी अयोध्येपर्यंतची तब्बल 663 किलोमीटरची सायकल यात्रा देखील पूर्ण केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारी 2019 मध्ये जयंत अग्रवाल यांच्या गाडीचा भयंकर अपघात झाला होता. या अपघातात गाडी 20 फूट खोल खड्ड्यात कोसळल्याने जयंत गंभीररित्या जखमी झाले होते.
अपघातामुळे जयंत यांना अनेक ठिकाणी फॅक्चर झालं होतं. त्यांची तीन वेळा सर्जरी झाली असून स्टीलचे रॉड शरीरात टाकण्यात आले आहेत. अनेक दिवस त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. डॉक्टरांनी त्यांना आयुष्यभर काठीच्या आधाराने चालावं लागेल असं सांगितलं होतं. तसेच काही दिवस ते दुखापतीमुळे जास्त हालचाल करू शकत नव्हते. जयंत यांच्या कुटुंबातील आई वडील, पत्नी, मुलगा, लहान भाऊ आणि त्याची पत्नी यांनी जयंत यांच्या ठीक होण्याची आशा सोडून दिली होती. ते पुन्हा आधीसारखे चालू शकतील असं त्यांना वाटलं देखील नव्हतं. याच दरम्यान जयंत यांनी सोशल मीडियावर प्रेरणादायी व्हिडीओ पाहायला सुरुवात केली.
मेंढ्या चारत असताना चुकून केला होता पाकिस्तानमध्ये प्रवेश, झाली होती अटक https://t.co/5NY1oe1Qbn#Gujarat#India#Pakistan
— Lokmat (@MiLOKMAT) January 24, 2021
अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर केलं पूर्ण
प्रेरणादायी व्हिडीओ पाहून जयंत यांचा आत्मविश्वास वाढला. आपण काही तरी करू शकतो याची त्यांना जाणीव झाली. त्यांनी सायकल चालवायला हळूहळू सुरुवात केली. मात्र सुरुवातीला शरीर साथ देत नव्हतं. थोडा त्रास सहन करावा लागला. मात्र सरावानंतर त्यांना सायकल नीट चालवायला जमू लागली. 2020 मध्ये त्यांनी अयोध्येपर्यंत सायकलवारी करण्याचा निर्णय घेतला. ऑक्टोबरमध्ये अयोध्यापर्यंतचे 663 किलोमीटरचे अंतर सायकलवर पूर्ण केलं. नोव्हेंबर 2021 महिन्यात ते काश्मीर ते कन्याकुमारी अंतर देखील पूर्ण करणार आहेत. सायकल यात्रेसाठी जयंत सध्या सराव करत आहेत.
दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा करतात सराव
जयंत दररोज साडेतीन तासात 100 किलोमीटर सायकल चालवण्याचा सराव करत आहेत. जयंत हे आता भोपाळमधील प्रसिद्ध सायकल क्लबबरोबर देखील जोडले गेले आहेत. जयंत यांना पाहून शहरातील 100 नागरिकांनी सायकल खरेदी केली असून गोविंदपुरा भागातील लहान मुलांनी देखील प्रेरित होऊन सायकल खरेदी केली आहे. यामुळे जयंत यांच्याकडून लहान मुलांना देखील प्रेरणा मिळाली आहे. कोणत्याही परिस्थितीत हार न मानता जिद्दीच्या जोरावर सर्व गोष्टी साध्य होतात हे जयंत य़ांनी दाखवन दिलं आहे, सर्वत्र त्यांचं भरभरून कौतुक होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
चॉकलेट प्रेमींसाठी खूशखबर! जगात कुठेही असाल तरी या कंपनीसाठी करू शकता काम, तब्बल 98,80,920 रुपये वार्षिक पगार https://t.co/UsJOy1NbNd#Toffee#Chocolate#Jobs
— Lokmat (@MiLOKMAT) January 26, 2021