नवी दिल्ली - कोरोनाने जगभरात थैमान घातले आहे. भारतासह जगभरात कोरोनाग्रस्तांची संख्या ही सातत्याने वाढत आहे. कोरोना व्हायरसमुळे सर्वत्र चिंतेचे आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे आहे. कोरोनावर मात करण्यासाठी बहुतांश देशांत लॉकडाऊन सुरू आहे. मात्र असे असतानाही कोरोनामुळे मृतांचा आकडा वाढतच चालला आहे. कोरोनाग्रस्तांसाठी वैद्यकिय क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहेत. आपल्या घरापासून दूर राहून डॉक्टर्स रुग्णांवर उपचार करत आहेत. असीच एक कौतुकास्पद घटना समोर आली आहे.
रुग्णांची सेवा करता यावे, त्यांच्यावर वेळेत उपचार करता यावेत यासाठी डॉक्टर्स खेड्यापाड्यात पायी प्रवास करत असल्याची माहिती मिळत आहे. दक्षिण कन्नडमधील बेल्थनगडीमध्ये श्री कृष्णा रुग्णालय आहे. येथील डॉक्टरांनी रुग्णांवर उपचार करता यावेत यासाठी एक अनोखी पद्धत अवलंबली आहे. डॉक्टर्स पीपीई किट घालून गावोगावचा पायी प्रवास करत गरजू लोकांवर उपचार करत आहेत.
डॉ. मुरली कृष्णा यांनी दिलेल्या माहितीनुसार, चारमाडी परिसरातील 40 किलोमीटरमध्ये एकच रुग्णालय आहे. आमची टीम 30 बेडच्या सुविधांसह काम करत आहे. तसेच फोनवर रुग्णवाहिका देखील पाठवली जाते. मात्र ज्या ठिकाणी रुग्णवाहिकी पोहचणं शक्य नसतं. तिथे डॉक्टर आणि टीम पायी प्रवास करून रुग्णांना मदत करत आहेत. यासाठी त्यांना कित्येक किलोमीटरचा प्रवास करावा लागत आहे.
कोरोनाच्या संकटात डॉक्टर्स अहोरात्र काम करत आहेत. रुग्णांची काळजी घेण्यासाठी शक्य तेवढे सगळे प्रयत्न करण्यात येत आहेत. खेड्यापाड्यात जाऊन रुग्णांना आरोग्य विषयक सेवा पुरवताना काही समस्यांचा सामना देखील डॉक्टरांना करावा लागत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा हा तब्बल 27 लाखांवर पोहोचला आहे. तर तब्बल 50 हजारहून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे.
महत्त्वाच्या बातम्या
धक्कादायक! तब्बल 4 महिने आईच्या मृतदेहाजवळ बसून होती मुलगी
बापरे! ...अन् उपमुख्यमंत्र्यांच्या बहिणीने घेतला दुकानदाराचा चावा, जाणून घ्या नेमकं काय घडलं?
"राहुल आणि सोनिया गांधी यांनी चीनकडून पैसे घेतले", भाजपा अध्यक्षांचा हल्लाबोल
Bihar Flood : नि:शब्द! बिहारला पुराचा तडाखा, मन हेलावून टाकणारा फोटो व्हायरल
"काँग्रेसच्या 100 नाराज नेत्यांनी सोनियांना पाठवलेलं पत्र, केली होती 'ही' मागणी"
...म्हणून रोहित पवारांनी मानले पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार