डॉक्टर महिलेच्या घरातून अडीच लाखाचा ऐवज लंाबवला
By admin | Published: February 22, 2016 12:02 AM
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरुच असून दंगलग्रस्त भागात राहणार्या डॉ.सुनंदा रमेशचंद्र प्रितमणी या सिंधी कॉलनीतील त्यांच्या दवाखान्यात गेल्याचे पाहून चोरट्यांनी शनिवारी रात्री साते ते दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातून दोन लाख १९ हजार रुपयांचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा दोन लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेबाबत मध्यरात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच परिसरात महिनाभरापूर्वी शिक्षिकेच्या घरातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता.
जळगाव: शहरात चोरी व घरफोडीच्या घटनांचे सत्र सुरुच असून दंगलग्रस्त भागात राहणार्या डॉ.सुनंदा रमेशचंद्र प्रितमणी या सिंधी कॉलनीतील त्यांच्या दवाखान्यात गेल्याचे पाहून चोरट्यांनी शनिवारी रात्री साते ते दहा वाजेच्या दरम्यान त्यांच्या घरातून दोन लाख १९ हजार रुपयांचे दागिने व १५ हजार रुपये रोख असा दोन लाख ३४ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेला आहे. या घटनेबाबत मध्यरात्री जिल्हा पेठ पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याच परिसरात महिनाभरापूर्वी शिक्षिकेच्या घरातून दीड लाख रुपयांचा ऐवज चोरी गेला होता.आकाशवाणी ते सिंधी कॉलनी दरम्यानचा परिसर अतिशय उच्चभ्रु मानला जातो. याच रस्त्याला लागून असलेल्या दंगलग्रस्त कॉलनीतील भगवती अपार्टमेंटमध्ये पहिल्या मजल्यावर राहणार्या डॉ.सुनंदा प्रितमणी या नेहमीप्रमाणे शनिवारीही संध्याकाळी सात वाजता सिंधी कॉलनीत त्यांच्या दवाखान्यात गेल्या होता.रात्रक्ष दहा वाजता दवाखाना बंद करुन घरी आल्या असता त्यांना दरवाजाचा कोयंडा तुटलेला तर घरातील लाईट सुरु दिसले. बेडरुममधील लोखंडी कपाटही उघडे होते. त्यामुळे घरात चोरी झाल्याची त्यांची खात्री पटली. दागिने व रोख रक्कम ठेवलेली तिजोरी पाहिली असता ती फुटलेली होती तर सोन्याचे दागिने व रोख गायब झाली होती.चार महिन्यापुर्वीच आल्या होत्या वास्तव्यालाडॉ.सुनंदा प्रितमणी या चार महिन्यापुर्वीच या अपार्टमेंटमध्ये राहायला आल्या होत्या. त्यापुर्वी गणपती नगरात त्यांचे वास्तव्य होते. मुलगा सुरत येथे नोकरीला आहे तर पतीचे निधन झाल्याने या घरात त्या एकट्याच वास्तव्याला होत्या.दवाखान्यात जाण्यापूर्वी त्यांनी लाकडी दरवाजाला कुलूप लावले होते, मात्र लोखंडी दरवाजाची नुसतीच कडी लावली होती.याच भागात २२ जानेवारी रोजी अशोका अपार्टमेंटमध्ये तिसर्या मजल्यावर राहणार्या जरीना सजाद बोहरा या शिक्षिकेच्या बंद घराचे कुलूप तोडून ३५ हजार रुपये रोख, ५५ हजार रुपये किमतीची हिर्याची अंगठी, ३२ हजार रुपये किमतीची सोनसाखळी व पंधरा हजार रुपये किमतीचे सहा ग्रॅम झुमके असा एक लाख ३७ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लांबविला होता. यापुर्वीही झाली होती चोरी अशोका अपार्टमेंटमध्ये वर्षभरापुर्वी डी.एस.कुळकर्णी यांच्या घरातही चोरी झाली होती तर जरीना यांचीही दुचाकी सात महिन्यापुर्वी चोरी झालेली आहे. तर भगवती अपार्टमेंटमध्ये सहा महिन्यापुर्वी चोरीचा प्रयत्न झाला होता. विशेष म्हणजे परिसरातील एकाही अपार्टमेंटमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत.