शहरं
Join us  
Trending Stories
1
एक्झिट पोल पुन्हा ठरले फोल! महायुतीला कौल दिला, पण ‘त्सुनामी’चा अंदाज नाही आला!
2
मोठी बातमी...! नागपूर दक्षिण-पश्चिममध्ये देवेंद्र फडणवीस यांचा दणदणीत विजय; होणार मुख्यमंत्री?
3
बारामतीची जनता हुशार; एका वाक्यात सुनेत्रा पवारांनी केले विरोधकांना गपगार...
4
मविआचे पानिपत...! महायुतीच्या मुसंडीची ही दहा जोरदार कारणे; ठाकरे, पवारांची सहानुभूती ओसरली...
5
Ramtek Vidhan Sabha Election Result 2024: ठाकरेंच्या शिवसेनेला रामटेकमध्ये जबर हादरा!
6
Badnera Assembly Election 2024 Result Live Updates: "आमच्या रामाचं बाण मतदारांनी चालवून दाखवलं, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार"
7
Kopri Pachpakhadi Vidhan Sabha Election Result 2024 Live: एकनाथ शिंदेच आनंद दिघेंचे खरे वारसदार! पुतण्या केदार दिघेंना किती मतं पडली, पाहा आकडे
8
कोकणात महायुतीची जोरदार मुसंडी, तब्बल ३३ जागांवर आघाडी, ठाकरेंना मोठा धक्का
9
हाय व्होल्टेज ड्रामा, ते अपक्ष उमेदवारी; शेट्टीचं तिकीट कापलेल्या मतदारसंघात संजय उपाध्यायांची सरशी
10
मराठवाड्यासह महाराष्ट्रात जरांगे फॅक्टर फेल, मतदारांचा महायुतीला भक्कम पाठिंबा...
11
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
12
Maharashtra Assembly Election Result 2024:  शिंदेंच्या शिवसेनेची घौडदौड! श्रीकांत शिंदे म्हणाले, "१८-२० तास काम करणारे मुख्यमंत्री..."
13
Maharashtra Assembly Election 2024 Results Highlights : "ज्यांच्या जास्त जागा त्यांचा मुख्यमंत्री असं ठरलेलं नाही"; शिंदेंनी मानले लाडक्या बहिणींचे आभार
14
Maharashtra Assembly Election Result 2024: पुन्हा निवडणूक घ्या, हा निकाल जनमताचा कौल नाही, नाही, नाही; संजय राऊत संतापले 
15
Maharashtra Election Result: "देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होतील", भाजपच्या नेत्याचं मोठं विधान
16
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: खेळ खल्लास! विधानसभेत ‘विरोधी पक्षनेता’ बसवणंही कठीण; ठाकरे, पवार गट, काँग्रेसवर नामुष्की?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : "'गिरे तो भी तंगडी ऊपर', अशी राऊतांची स्थिती"! शिवसेना शिंदे गटाचा टोला
18
Shrivardhan Vidhan Sabha Election Result 2024 Live : राज्यातील पहिला निकाल: महायुतीची लाडकी बहीण आदिती तटकरे जिंकल्या; औपचारिक घोषणा बाकी!
19
शोभिता धुलिपालासोबत नवीन प्रवास सुरू करण्यासाठी नागा चैतन्य उत्सुक, म्हणाला- "कमतरतेला ती..."
20
Wadala Vidhan Sabha Election Result 2024 : कालिदास कोळंबकरांचा वर्ल्ड रेकॉर्ड! वडाळ्यातून नवव्यांदा झाले आमदार

कोरोना लसीमुळे खरेच हार्ट अटॅक येतो का?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2023 5:50 AM

सरकार म्हणते, लसीमुळे एकही मृत्यू नाही

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरात युवकांच्या आकस्मिक मृत्यूंसाठी कोरोना लस कारणीभूत नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) म्हटले आहे. कोरोनाची झालेली बाधा, कुटुंबात आकस्मिक मृत्यू होण्याचा असलेला वैद्यकीय इतिहास तसेच बदललेली जीवनशैली या गोष्टींमुळे युवकांमध्ये आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना घडल्या आहेत. 

आकस्मिक मृत्यू होण्यामागे कोरोना लस हे कारण नसल्याचे या संस्थेने म्हटले आहे. अलीकडे हार्ट अटॅकने मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. 

निष्कर्ष काय?n१८ ते ४५ वर्षे वयोगटातील व्यक्तींच्या आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना घडत आहेत. त्यासंदर्भात आयसीएमआरने अभ्यास केला. त्यावरून हा निष्कर्ष काढण्यात आला. nनिरोगी युवकांचे आकस्मिक मृत्यू होण्याच्या घटना या लसीमुळे होत असाव्यात, अशी शंका व्यक्त होत होती. त्यामुळे या विषयाचा आयसीएमआरने अभ्यास करण्याचा निर्णय घेतला होता. 

या संस्थेने सुमारे ३ हजार प्रकरणांचा अभ्यास केला. या व्यक्ती १८ ते ४५ वर्षे वयोगटातील होत्या. तसेच त्यांना एकाहून अधिक व्याधी नव्हत्या. मात्र १ ऑक्टोबर २०२१ ते ३१ मार्च २०२३ या कालावधीत त्या व्यक्तींच्या मृत्यूंच्या घटना घडल्या.

कोरोनाने लोक मरत असतील; तर मरू द्या : ऋषी सुनक२०२०मध्ये कोरोना साथीच्या दरम्यान दुसऱ्यांदा लॉकडाऊन लागू करण्याच्या विरोधात ब्रिटनचे विद्यमान पंतप्रधान (व तत्कालीन अर्थमंत्री) ऋषी सुनक यांनी विरोध केला होता. कोरोना साथीमध्ये माणसे मरत असतील तर मरू देत, अशी भूमिका सुनक यांनी घेतली होती, असा दावा कोरोनाबाबत नेमलेल्या एका समितीने केला. 

कोरोनाची स्थिती कशी हाताळली, याचा अभ्यास ही समिती करत आहे. २०२० मध्ये सुनक यांनी एका बैठकीत जी वक्तव्ये केली ती त्यावेळचे मुख्य वैज्ञानिक सल्लागार पॅट्रिक वॉलेस यांनी डायरीमध्ये टिपूून घेतली होती. त्याच्याच आधारे आता समितीने हा दावा केला आहे. 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसcorona virusकोरोना वायरस बातम्याHeart Attackहृदयविकाराचा झटका