आपणास पैसा सर्वश्रेष्ठ वाटतो का? आपल्या आयुष्यात पैशाला सर्वश्रेष्ठ स्थान आहे का? याचे उत्तर हो असेल तर जरा इकडे लक्ष द्या. पैसा हा महत्त्वाचा घटक आहे हे सर्वांनी मान्य अवश्य करावे. परंतु पैसे हे एक माध्यम आहे, हे सत्य अस्वीकार करू नये. फक्त पैसा पैसा करत बसलात तर आयुष्याच्या इतर आनंदास आपण अवश्य मुकला असे समजा.
पैशापेक्षा महत्त्वाचे काय?
- आपले शारीरिक आरोग्य
- आपले मानसिक आरोग्य.
- नियमित व्यायामाचा अभाव आणि असंतुलित आहार यामुळे शारीरिक व्याधी वाढत जातात. कायम नकारात्मक विचारांमुळे शरीरावर परिणाम होतात. हे एक दुष्टचक्र आहे.
- पैसा महत्त्वाचे साधन असल्याने त्याचाच विचार मनात असल्याने शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे आपण नकळत दुर्लक्ष करीत राहतो.
- पैसे तर येतात, परंतु त्याचा सुयोग्य उपभोग घेण्यासाठी आयुष्याचा उत्तरार्धात मन आणि शरीर साथ देत नसते.
- आरोग्याच्या सतत तक्रारींमुळे औषध आणि दवाखाना यावर अतिरिक्त खर्च होतो. या परिस्थितीचा नकारात्मक परिणाम आपल्या मनावर होतो व या दुष्टचक्रात आपण अडकत जातो.
हे विचारात घ्या-
- पैसे कमविणे जसे महत्त्वाचे, तसे शरीर आणि मन कमविणेही महत्त्वाचे
- दररोज जसे पैसे कमविण्यासाठी मेहनत करतो, तशीच मेहनत शारीरिक आणि मानसिक आरोग्य कमविण्यासाठी घ्या.
- थेंबे थेंबे तळे साचे, ही म्हण जशी पैशांसाठी आहे, तशीच शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्य कमविण्यासाठी सुद्धा आहे.
- अर्थनीतीचा अर्थ फक्त पैसे नसून शारीरिक आणि मानसिक तंदुरुस्तीत सुद्धा आहे.