शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण आडवाणी पुन्हा रुग्णालयात, आठवडाभरात दुसऱ्यांदा झाले दाखल
2
"आदिवासी नेत्याला CM पदावरून हटवणे अत्यंत दु:खद", हिमंता बिस्वा सरमा यांचा जेएमएम-काँग्रेसवर निशाणा
3
"मी आधीच निघून गेलो होतो, समाजकंटकांनी..."! हाथरस दुर्घटनेवर भोले बाबा यांची पहिली प्रतिक्रिया
4
18 राज्‍यांमुळे भारतीय अर्थव्यवस्थेचा जगात डंका, यांच्याकडून मिळतो तब्बल 90 टक्के पैसा!
5
राहुल द्रविडने नेमकं काय केलं? फक्त ‘त्या’ एका गोष्टीला ‘हरवलं’ अन् टीम इंडियानं जग जिंकलं.. 
6
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची नोंदणी ३१ ऑगस्टनंतरही सुरु राहणार”: आदिती तटकरे
7
जो बायडेन यांचा पत्ता कट? मिशेल ओबामा लढवणार राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक
8
झारखंडमध्ये नेतृत्वबदल, चंपई सोरेन यांनी दिला मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा, हेमंत सोरेन पुन्हा होणार CM  
9
"जगभर फिरतात, पण मणिपूरला जात नाहीत..." काँग्रेसची पीएम नरेंद्र मोदींवर बोचरी टीका
10
“ड्रोनचा खोडसाळपणा जरांगेंच्या लोकांचा, काही पदरात पाडून घेण्याचा प्रोग्राम”: नवनाथ वाघामारे
11
कोल्हापूर : वर्दी परिधान करण्याअगोदरच मृत्यू; २६ वर्षीय तरूणाची चटका लावणारी एक्झिट
12
“लोणावळा भुशी धरण दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबीयांना प्रत्येकी ५ लाखांची मदत”: अजित पवार
13
कुटुंबातील दोन जणींना लाभ,'लाडकी बहीण'चे निकष बदलले, फडणवीसांनी महिलांना असे आवाहन केले  
14
भारत जगातील तिसऱ्या क्रमांकाची मोठी अर्थव्यवस्था बनला तर काय-काय बदलेल? खुद्द PM मोदींनी सांगिलं
15
Champions Trophy 2025 : लाहोरमध्ये होणार IND vs PAK महामुकाबला; सामन्याची तारीख ठरली?
16
लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला तरी लढाई अजून संपलेली नाही, नाना पटोले यांचे स्पष्ट संकेत 
17
संभाजी भिडेंचे ते वक्तव्य अन् हिरवाई उद्यान; पुण्यात लागले मस्त आणि त्रस्त ग्रुपचे बॅनर
18
खासदारकीची शपथ घेण्यासाठी तुरुगांतून बाहेर येणार अमृतपाल सिंह, पॅरोल मिळाल्याची माहिती 
19
४ जुलैला मरीन ड्राईव्ह, वानखेडेवर भेटू...; भारताच्या वाटेवर असताना रोहित शर्माची मोठी घोषणा
20
“हे खरे नसेल तर माझ्यावर हक्कभंग आणा”; पेपरफुटीवरुन देवेंद्र फडणवीसांचे विरोधकांना आव्हान

"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2024 4:31 PM

Lok Sabha Election 2024: गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना (Narendra Modi) माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार्जुन खर्गे (Mallikarjun Kharge) यांनी केलं आहे. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महात्मा गांधींबाबत केलेल्या विधानावरून सध्या मोठा वाद निर्माण झाला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी या मुद्द्यावरून नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली आहे. नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जगाला सांगितलं की, त्यांना गांधीजींबाबत चित्रपट पाहिल्यानंतर माहिती मिळाली. मोदींच्या या विधानाबाबत हसू येतं. गांधीजींना संपूर्ण जग ओळखतं. यूएनपासून प्रत्येक ठिकाणी ते आहेत. गांधीजी हे जगातील लोकांची प्रेरणा ठरले आहेत. जर महात्मा गांधींबाबत मोदींना माहिती नसेल तर त्यांना राज्यघटनेबाबतही माहिती नसेल,असं विधान मल्लिकार्जुन खर्गे यांनी केलं आहे.

मल्लिकार्जुन खर्गे म्हणाले की, ही निवडणूक कायम लक्षात ठेवली जाईल. जात-धर्म-वर्ग सोडून संपूर्ण देश हा राज्यघटना वाचवण्यासाठी पुढे आला. आम्ही विविध मुद्द्यांच्या आधारावर मतं मागितली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १५ दिवसांच्या भाषणामध्ये २३२ वेळा त्यांनी काँग्रेसचं नाव घेतलं. ५७३ वेळा इंडिया आघाडीचं नाव घेतलं. मात्र बेरोजगारीबाबत ते चकार शब्द बोलले नाहीत. यादरम्यान मोदींनी ४२१ वेळा मंदिर-मशीद आणि २२४ वेळा पाकिस्तानचं नाव घेतलं, असा टोला मल्लिकार्जुन खर्गे यांनी लगावला.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मुलाखतीमध्ये महात्मा गांधी यांच्याबाबत बोलताना गांधीजींवर चित्रपट तयार झाल्यानंतर जगाला महात्मा गांधींबाबत समजलं, असा दावा केला होता. या मुलाखतीचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर  मोठ्या प्रमाणात टीका होऊ लागली आहे. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. ते म्हणाने की, नरेंद्र मोदी गांधीजींना ओळखत नाहीत. त्यांना गोडसे कळतात. तसेच गोडसेंच्या मार्गावून मार्गाक्रमण करतात. महात्मा गांधी संपूर्ण जगासाठी प्रेरणा होते. मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर, नेल्सन मंडेला, अल्बर्ट आइन्स्टाइन ये सर्वजण गांधीजींपासून प्रेरित झाले होते, असं विधान राहुल गांधी यांनी केलं होतं.  

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Narendra Modiनरेंद्र मोदीMallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेBJPभाजपाcongressकाँग्रेस