शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
8
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
9
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
10
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
11
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
12
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
13
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
14
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
15
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
16
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
17
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
18
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
19
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
20
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?

केरळमध्ये हत्तिणीपाठोपाठ कुत्र्याचा अमानुष छळ, टेपनं तोंड करकचून बांधलं

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 10:21 PM

तो कोणाच्याही नजरेस पडला नाही, अशी माहिती पीपल फॉर ऍनिमल वेल्फेयर सर्व्हिसेसच्या सदस्यानं दिली आहे.

तिरुअनंतपूरमः केरळमध्ये हत्तिणीपाठोपाठ एका कुत्र्यालाही वेदना दिल्याचा प्रकार समोर आला आहे. त्रिशूर येथे एका निर्दोष कुत्र्याचा छळ केल्याची क्रूर घटना घडली आहे. या कुत्र्याच्या तोंडाला टेप गुंडाळण्यात आली होती. पीपल फॉर ऍनिमल वेलफेयर सर्व्हिसेस (पीएडब्ल्यूएस)च्या सदस्यांनी ते पाहिलं आणि जवळपास २ आठवड्यांनंतर त्या कुत्र्याला वाचवलं. तोंडाला पट्टी बांधल्यानं बरेच दिवस कुत्रा कुठेतरी लपून बसला होता, त्यामुळे तो कोणाच्याही नजरेस पडला नाही, अशी माहिती पीपल फॉर ऍनिमल वेल्फेयर सर्व्हिसेसच्या सदस्यानं दिली आहे.कुत्रा बराच काळ भुकेला आणि तहानलेला होता. पीएडब्ल्यूएसच्या सदस्यांनी कुत्र्याच्या तोंडाची पट्टी काढून त्याला खाण्यास दिलं आणि २ लिटर पाणी पाजलं. हा कुत्रा जवळपास तीन वर्षांचा आहे आणि त्याला त्रिशूरमधील ओल्लूर येथून वाचविण्यात आले. आम्हाला याची माहिती मिळताच आम्ही तिथे पोहोचलो आणि कुत्राच्या तोंडातून टेप काढून टाकली. यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. कुत्र्याच्या तोंडावर टेपचे अनेक रोल बांधलेले होते. ज्यामुळे तोंडावर जखमेच्या खुणा दिसत होत्या आणि नाकाच्या भोवतीची हाडेसुद्धा दिसू लागली होती.पीएडब्ल्यूएसचे सचिव रामचंद्रन म्हणतात की, आम्हाला हा कुत्रा त्रिशूरच्या ओल्लूर जंक्शन येथे सापडला. प्रथम आम्हाला वाटले होते की टेपचा एकच रोल कुत्राच्या तोंडाला बांधलेला असेल. पण आम्ही पाहिले की कुत्र्याच्या तोंडावर टेपचे अनेक थर गुंडाळलेले होते, असंही रामचंद्रन यांनी सांगितलं. कुत्री काही आठवडे न खाताच जगू शकतात. पण ते खूप कमकुवत बनतात. या कुत्र्याला अँटीबायोटिक्स दिली गेली आहेत आणि आता त्या कुत्र्याची प्रकृती स्थिर आहे. याप्रकरणी आम्ही पोलिसांत तक्रार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. गेल्या आठवड्यात केरळमधील मलप्पूरम येथे काही निर्दयी लोकांनी गर्भवती हत्तिणीला फटाक्यांनी भरलेलं अननस खायला दिलं. अननस खाल्ल्यानंतर हत्तिणीच्या तोंडात फटाके फुटले आणि हत्तिणीच्या गर्भाशयात वाढणार्‍या पिलासह तिचा मृत्यू झाला. त्यानंतर देशभरातून हळहळ व्यक्त करण्यात आला. सोशल मीडियावरही या घटनेचे तीव्र पडसाद उमटले होते. 

हेही वाचा

CoronaVirus News: चिंताजनक! राज्यात कोरोनाबाधितांची संख्या ८८ हजारांच्या पुढे, आज २५५३ नवे रुग्ण सापडले 

...म्हणून हत्तिणीनं 'ते' फटाक्यांनी भरलेलं अननस खाल्लं असावं, पर्यावरण मंत्रालयाचं स्पष्टीकरण

लॉकडाऊनचा परिणाम! नोकरी गमावली; डबल पोस्ट ग्रॅज्युएट शिक्षक विकतोय केळी

CoronaVirus : सिंधुदुर्गात आणखी 9 कोरोनाबाधित सापडले; एकूण रुग्णसंख्या 130च्या वर

LACजवळ चीननं वाढवल्या हेलिकॉप्टर्सच्या घिरट्या; एअरबेसवर भारताची करडी नजर

लडाख सीमेवरची स्थिती सगळ्यांनाच माहित्येय, राहुल गांधींचा 'शाह'जोग टोला

लष्कराला मोठं यश; दोन आठवड्यांत ९ ऑपरेशन्स, २२ दहशतवाद्यांचा खात्मा

पाकच्या सरकारी टीव्ही चॅनेलनं दाखवला पाकव्याप्त काश्मीर भारताचा भाग, उडाली एकच खळबळ

टॅग्स :Keralaकेरळdogकुत्रा