नवी दिल्ली : कंपन्यांसाठी असलेला जुना दिवाळखोरीविषयक कायदा बदलल्यानंतर सरकार आता बँका आणि वित्तीय कंपन्यांसाठी स्वतंत्र दिवाळखोरीबाबत कायदा करणार आहे. कोणत्याही ठप्प झालेल्या (बंद पडलेल्या) शाखेवर पहिला अधिकार ठेवीदारांचा राहणार आहे.वित्त राज्यमंत्री जयंत सिन्हा यांनी एका मुलाखतीत ही माहिती दिली. ते म्हणाले की, नवीन कायद्याचा मसुदा तयार केला जात आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या बँका, सूक्ष्म वित्तीय संस्था आणि एनबीएफसी यासारख्या संस्था योग्य त्या वेळेत बंद करण्यास मदत मिळेल. त्याचबरोबर छोट्या ठेवीदारांच्या हिताचे रक्षणही केले जाईल.
‘दिवाळखोरीविषयक कायदा करणार’
By admin | Published: June 13, 2016 6:05 AM