- खलील गिरकरमुंबई : भारतातील देशांतर्गत हवाई प्रवास करणाऱ्यांच्या संख्येत १८.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. गेल्या १३ महिन्यांतील ही १२व्या वेळी सातत्याने झालेली वाढ आहे. दुहेरी आकड्यात झालेली ही वाढ सलग ४७व्या महिन्यात झाली आहे.आशिया खंडात भारतापाठोपाठ चीनच्या देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत वाढ झाली असून चीन दुसºया क्रमांकावर आहे. चीनमध्ये झालेली वाढ १४.८ टक्के आहे. इंटरनॅशनल एअर ट्रान्सपोर्ट असोसिएशन (आयएटीए) च्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे. जुलै २०१७च्या तुलनेत जुलै २०१८मध्ये झालेली ही वाढ आहे.जागतिक पातळीवर प्रति किलोमीटर प्रवासी महसूल वाढीच्या दरात गेल्या वर्षाच्या जुलैपर्यंतचा दर ६.२ टक्के आहे. जूनच्या तुलनेत त्यामध्ये घट झाली आहे. जूनमध्ये हा दर ८.१ टक्के होता.जागतिक पातळीवर जानेवारी ते जुलै या २०१७च्या तुलनेत यामध्ये वाढ झाली असून यंदा ६.९ टक्के दर गाठण्यात यश आले आहे. आशिया पॅसिफिक क्षेत्रामध्ये गेल्या तीन महिन्यांत प्रथमच वाढ झाली आहे. जागतिक पातळीवर देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत मात्र काहीशी घट झाली आहे. जून महिन्यात ही वाढ ८.० टक्के होती ती जुलैमध्ये ७.८ टक्के झाली आहे.जागतिक पातळीवर एकूण हवाई क्षेत्रापैकी ६३.८ टक्के हिस्सा आंतरराष्ट्रीय प्रवासाचा आहे तर ३६.२ टक्के हिस्सा देशांतर्गत प्रवासाचा आहे. एकूण हवाई प्रवासाच्या ६३.८ टक्के असलेल्या आंतरराष्ट्रीयप्रवास भागामध्ये सर्वाधिक हिस्सा युरोप खंडाचा २३.७ टक्के आहे,तर त्याखालोखाल आशिया पॅसिफिक विभागाचा १८.५ टक्के आहे.कमी हवाई प्रवास दराचा फायदादेशांतर्गत हवाई प्रवास करण्यामागे कमी हवाई प्रवास दर, रेल्वेच्या तुलनेत अत्यंत कमी वेळात इप्सित स्थळी पोहोचण्याची हमी यासह अन्य कारणांचा समावेश असल्याची माहिती हवाई वाहतूक क्षेत्रातील तज्ज्ञांनी वर्तविली. जीवनमानाच्या दर्जामध्ये सातत्याने होत असलेली वाढ, विमानतळांचे वाढते नेटवर्क अशा विविध बाबींमुळे ही वाढ झाली आहे. जुलै महिन्याच्या अभ्यासानंतर हे निष्कर्ष जागतिक पातळीवरील संस्थेने जाहीर केले आहेत.
देशांतर्गत हवाई प्रवाशांच्या संख्येत जुलै महिन्यात १८ टक्क्यांची वाढ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2018 4:36 AM