मुंबई : हवाई प्रवासादरम्यान सुरक्षा नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यासाठी देशांतर्गत प्रवाशांना केवळ एक बॅग बाळगण्याची परवानगी द्यावी, अशी सूचना केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) विमान वाहतूक सुरक्षा एजन्सीला केली आहे. हा नियम सर्व भागधारक आणि विमान कंपन्यांनी लागू केला की नाही, याची खात्री करण्याची विनंतीही करण्यात आली आहे.एकापेक्षा अधिक बॅगा आणल्यास तपासणी केंद्रांवर (स्क्रीनिंग पॉइंट) गर्दी होते. परिणामी क्लीअरन्सची वेळ वाढते. त्यामुळे इतर प्रवाशांची गैरसोय होण्यासह वेळापत्रकावरही परिणाम होतो. असे प्रकार टाळण्यासाठी उपाययोजना अत्यावश्यक आहे. त्यामुळे महिलांच्या गरजेच्या बॅगा वगळता इतर कोणत्याही प्रवाशाला एकाहून अधिक बॅगा बाळगण्याची परवानगी देऊ नये. सर्व एअरलाइन्स आणि विमानतळ ऑपरेटरना या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना द्यावी. तसेच विमान कंपन्यांना त्यांची तिकिटे आणि बोर्डिंग पासवर ‘एक हँडबॅग नियम’ स्पष्टपणे प्रदर्शित करण्याचे निर्देश द्यावेत, अशी सूचना करण्यात आली आहे.
देशांतर्गत विमान प्रवासात एकच बॅग हवी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 22, 2022 9:52 AM