शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच; मुंबईतल्या 'या' ६ जागांवर दोन्ही पक्षांचा दावा
2
मंगळवारी ठरणार फॉर्म्युला, अमित शाह यांच्या उपस्थितीत ठरणार महायुतीचे जागावाटप
3
२,६०० पदे कंत्राटी पद्धतीने भरणार; ‘जीआर’चा शासनालाच पडला विसर
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२४; नवीन कार्यारंभ करायला आजचा दिवस अनुकूल
5
आघाडी अन् युती कोणाच्या पथ्यावर? काँग्रेस ८२ पार गेली नाही; वेगळे लढल्यावर भाजपला यश
6
राज्यात ‘परिवर्तन महाशक्ती’ तिसरी आघाडी; राजू शेट्टी, संभाजीराजे, बच्चू कडू यांचा पुढाकार; २६ सप्टेंबरला मेळावा
7
आपल्यालाही मिळणार गुडन्यूज? अमेरिकेत अडीच वर्षांनी झाली व्याजदरांत कपात, आता नजर आरबीआयवर
8
एनपीएस : लाभार्थ्यांत महाराष्ट्र, यूपी आघाडीवर; संख्येत सातत्याने वाढ : २०२३ मध्ये एक कोटी ७३ लाख संख्या
9
अडीच कोटी पाकिस्तानी मुले शाळेबाहेर ! धक्कादायक माहिती उघड
10
तिरुपतीच्या लाडूत प्राण्याची चरबी? आरोपावरून वादळ; प्रयोगशाळेच्या अहवालावरुन मुख्यमंत्री नायडू व वायएसआरसीपीची एकमेकांवर टीका
11
दाेन हजार घरे; सव्वा लाख अर्ज, म्हाडाच्या परवडणाऱ्या घरांची मुंबईकरांना भुरळ
12
पूजा खेडकरकडे कोर्टाने मागितला खुलासा; बायोमेट्रिक नमुने घेतल्याची खोटी साक्ष दिल्याचा यूपीएससीचा आरोप
13
खाद्यतेल, मिरची पावडर, दुधाचे नमुने जप्त; अन्न व औषध प्रशासनाची विशेष मोहीम
14
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा ‘परफॉर्मन्स’ कसा राहणार? २०१९ मध्ये मुंबईत लढविल्या होत्या २५ जागा
15
राहुल यांच्या लोकप्रियतेने भाजपमध्ये वाढती घबराट; काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांचे टीकास्त्र
16
आवाजाचा डेसिबल डबल! ईद, गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेंचा दणदणाट, मुंबईकरांच्या कानठळ्या बसल्या
17
सीए ॲनाच्या मृत्यूची केंद्राकडून चौकशी; कामाच्या प्रचंड ताणाचा करणार तपास
18
कुलगुरूपदावरील नियुक्ती रद्द; डॉ. अजित रानडे यांची हायकोर्टात धाव
19
सख्ख्या भावानेच केली लहान भावाची हत्या; धरणात आढळलेल्या मृतदेहाचा छडा
20
मुंबईकरांनी मारला सव्वालाख टन आंब्यांवर ताव; एप्रिल-मे महिन्यात ५०० कोटींची उलाढाल

देशांतर्गत जलवाहतूक होणार सुरक्षित; पहिल्या रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीमचे उद्घाटन

By admin | Published: January 06, 2016 11:53 PM

भारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे.

सुरेश भटेवरा,  नवी दिल्लीभारतात स्वस्त दरात आधुनिक पद्धतीची देशांतर्गत जलवाहतूक हे केंद्र सरकारचे स्वप्न असून नौकानयन मंत्रालयाने त्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. देशांतर्गत जलवाहतुकीत दोन जहाजांची टक्कर अथवा पुलांच्या अर्धवट बांधकामांवर जहाजांचे आदळणे, अपघात व नैसर्गिक संकटांपासून सुरक्षित देशांतर्गत जलवाहतुकीसाठी, एअर ट्राफिक कंट्रोलच्या धर्तीवर आधुनिक रिव्हर इन्फर्मेशन सिस्टीम कार्यरत करण्यात आली आहे. भारतातील पहिली जलमार्ग नियंत्रण व्यवस्था गंगा नदीवरील हल्दिया ते फराक्का या ५४५ कि.मी अंतराच्या जलमार्गावर कार्यरत झाली असून त्याचे औपचारिक उद्घाटन बुधवारी केंद्रीय जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरींच्या हस्ते दिल्लीच्या परिवहन मंत्रालयात पत्रकारांच्या उपस्थितीत झाले. देशांतर्गत जलवाहतूक नगण्यउद्घाटनप्रसंगी पत्रकारांशी बोलताना गडकरी म्हणाले, जगातल्या प्रमुख देशांच्या तुलनेत भारतात देशांतर्गत जल वाहतुकीचे प्रमाण अतिशय नगण्य आहे. रस्ता वाहतुकीचा खर्च सरासरी १.५० रुपया प्रति कि.मी. तर रेल्वे वाहतुकीचा १ रुपया प्रति कि.मी. येतो. त्या तुलनेत जलवाहतुकीचा खर्च अवघा २५ ते ३० पैसे प्रति कि.मी. आहे. देशातील बरीचशी प्रवासी व मालवाहतूक जलमार्गाने केल्यास मोठ्या नद्यांलगत नव्या औद्योगिक वसाहती, शीतगृहे व प्री-कुलिंग केंद्रे उभी राहतील. कृषी उत्पादनांच्या स्वस्त वाहतुकीबरोबरच नवे रोजगारही त्यातून निर्माण होऊ शकतील. भारतात आंतरराष्ट्रीय दर्जाची अशी जलवाहतूक लवकरात लवकर सुरू व्हावी यासाठी केंद्रीय जहाजबांधणी मंत्रालयाने वेगाने प्रयत्न सुरू केले असून त्यात अग्रक्रमाने गंगा, ब्रह्मपुत्रा, महानदी, आंध्रप्रदेश व तामिळनाडू दरम्यानचा बकिंगहॅम कॅनॉल व केरळचे बॅकवॉटर अशा पाच देशांतर्गत जलमार्ग वाहतुकीचे काम सुरू झाले आहे.