- राजेश शेगाेकार पाटणा - दोन वर्षांपेक्षा जास्त काळ तुरुंगात असलेल्या दोषींना सुटकेनंतर सहा वर्षापर्यंत निवडणूक लढविता येत नाही. बिहारच्या राजकारणाची सुत्रे हलविणाऱ्या या बाहुबलींनी आता आपआपल्या पत्नींना निवडणुकीच्या रिंगणात उभे केले आहे. अशा बाहुबलींना साेबत ठेवण्यासाइी जडीयुचे नितीश कुमार व आरजेडीचे लालुप्रसाद यादव यांच्या पक्षांनी पायघड्या टाकल्या आहेत हे विशेष.
पप्पू यादवांची बंडखाेरी पूर्णीयाच्या जागवेर काॅंग्रेसचे राजेश रंजन उर्फ पप्पू यादव यांना उमेदवारी हवी हाेती जागा वाटपात हा मतदारसंघ राजदला गेला असून तेथे राजदच्या बिमा भारती यांना उमेदवारी दिली आहे. ‘जान देंगे लेकीन पूर्णीया नही देंगे’ अशी घाेषणा करणारे यादव यांनी गुरूवारी उमेदवारी अर्ज दाखल केला.
कटीहारमध्ये घरचा आहेरदूसरीकडे कटिहार मतदारसंघ काॅग्रेसला मिळाला असून तेथे काँग्रेसने तारिक अन्वर यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघात राजदचे राज्यसभा सदस्य अहमद अशफाक करीम यांनीही बंडाचे निशाण फडकवून राजद ला घरचा आहेर दिला आहे.
- अशोक महतो हे बिहारमधील कुख्यात नाव. काॅंग्रेसच्या खासदार राजाे सिंग यांचा मृत्यू झालेल्या शेखपुरा व जेलब्रेक अशा हत्याकांडात दाेषी. ६२ वर्षाच्या अशाेक महताे यांनी ४६ वर्षाच्या अनिता यांच्याशी लग्न केले व त्याच दिवशी राजदने मुंगेर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर झाली.
- अवधेश मंडल काेसी व पूर्णीयामधील माेठा गुन्हेगार, खुन, अपहरण यासारख्या गंभीर गुन्ह्यात खटले दाखल आहेत. विशेष म्हणजे पत्नी बीमा भारती यांनीही त्याच्याविरुद्ध मारहाणीची तक्रार केली हाेती. त्याच बिमा भारती आता राजदच्या तिकिटावर पूर्णियातून निवडणूक लढवणार आहेत.
- आनंद मोहनला गोपालगंजचे जिल्हा दंडाधिकारी जी कृष्णय्या यांनी लिंचिंग प्रकरणी दोषी ठरवून १६ वर्षांची शिक्षा सुनावली होती. त्यांची पत्नी लवली आनंद शिवहर मतदारसंघातून जेडीयु च्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. त्यांना औरंगाबाद येथून निवडणूक लढवायची हाेती.
-जेडीयूचे आमदार रमेश कुशवाह यांनी २०१६ मध्ये एका हत्येप्रकरणात स्थानिक न्यायालयात आत्मसमर्पण केले होते. याप्रकरणी त्याच्याविरुद्ध खटला अद्याप प्रलंबित आहे. तरीही त्यांनी आपली पत्नी विजयलक्ष्मी देवी यांच्यासाठी सिवानमधून उमेदवारी मिळविली आहे.