लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : जगभरात महिला सक्षमीकरणाबाबत बरीच चर्चा केली जाते, त्यासाठी निधीही खर्च होतो. तरीही खासगी वा कॉर्पोरेट क्षेत्रात प्रमोशनसाठी महिलांना संघर्ष करावा लागतो. कंपन्यांमध्ये पदोन्नतीसाठी महिलांच्या तुलनेत पुरुषांनाच प्राधान्य दिले जात असल्याचे मॅकिन्से ॲण्ड कंपनीच्या अहवालात म्हटले आहे.
आम्हालाही हवंय नेतृत्वअहवालानुसार, व्यवस्थापकपदासाठी १०० पुरुषांच्या तुलनेत ८७ महिलांना संधी मिळाली.३० पेक्षा कमी वयाच्या १० पैकी ९ महिलांना त्यांच्या क्षेत्रात पुढे जायचे आहे.चारपैकी तीन महिलांना त्यांच्या क्षेत्रात वा कार्यालयात नेतृत्व करण्याची इच्छा आहे.
महिलांना कमी लेखले जातेबहुतांश कार्यालयांमध्ये महिला नोकरदारांनी घेतलेल्या निर्णयावर शंका वा प्रश्न उपस्थित केले जातात. अनेकदा त्यांच्या कामाचे श्रेय इतर लोक घेतात किंवा त्यांना कनिष्ठ समजून वारंवार रोखले जाते. काही प्रसंगी त्यांच्या दिसण्यावरही चर्चा केली जाते.
आकडे काय सांगतात?महिला सेवा, व्यापार आणि शिक्षण क्षेत्रात वरिष्ठ पदावर कार्यरत आहेत.महिला कनिष्ठ स्तरावर काम करतात.पेक्षा कमी महिला नोकरदार बांधकाम, वित्तीय सेवा आणि रियल इस्टेट क्षेत्रात एकूण नोकरदारांमध्ये महिलांचे प्रमाण