शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआचा जागावाटपाचा गुंता सुटेना; काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांना दिल्लीत थांबण्याचे आदेश
2
T20 World Cup: न्यूझीलंडच्या महिला जगज्जेत्या! दक्षिण आफ्रिकेवर ३२ धावांनी विजय
3
मुंबई विद्यापीठाने नियोजित परीक्षा पुढे ढकलल्या; विद्यार्थी मतदारांसाठी घेतला निर्णय
4
भाजपच्या पहिल्या यादीत बहुतेक जुन्याच चेहऱ्यांना संधी; फडणवीस यांच्यासह सर्व १० मंत्री मैदानात
5
तीन आमदारांचे टेन्शन वाढले; मुंबईत नार्वेकर, लोढा, शेलार यांचा अपेक्षेप्रमाणे पहिल्या यादीत समावेश
6
नालासोपाऱ्यातून भाजपाच्या राजन नाईक यांना उमेदवारी; क्षितिज ठाकूर यांचे आव्हान
7
भाजपच्या ठाणे जिल्हा यादीत प्रस्थापितांवरच पसंतीची मोहोर! तर्कवितर्कांना पूर्णविराम, उमेदवारी जाहीर
8
विधानसभेसाठी भाजपाकडून महामुंबईत विद्यमान २३ आमदार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार!
9
महाविकास आघाडी तुटण्याच्या दिशेने?; भास्कर जाधव कडाडले, काँग्रेसला करून दिली आठवण
10
जम्मू काश्मीरात दहशतवादी हल्ला; गांदरबल इथं गोळीबारात ३ मजूर ठार तर ५ जखमी
11
समाजवादी गणराज्य पक्ष काँग्रेसमध्ये विलीन; कपिल पाटील यांचा दिल्लीत पक्षप्रवेश
12
नाशिकमध्ये सीमा हिरेंच्या उमेदवारीला पक्षातच विरोध; महायुतीत बंडखोरीची शक्यता
13
"आमच्यात वाद नव्हताच..."; उमेदवारी न मिळालेल्या भाजपा आमदार अश्विनी जगपात यांचं विधान
14
१५ बैठका, ३४० तास चर्चा तरीही जागावाटप सुटेना; 'मातोश्री'तील बैठकीत काय घडलं?
15
पक्षफुटीनंतरही एकनिष्ठ राहिलेल्या आमदाराचा शरद पवारच करणार 'करेक्ट कार्यक्रम'?
16
कुटुंबवादामुळे तरुणांचे नुकसान; 1 लाख तरुणांना राजकारणात आणणार, PM मोदींची घोषणा
17
Video - मोबाईलवर बोलत रेल्वे ट्रॅक ओलांडत होता 'तो'; अचानक समोरून आली ट्रेन अन्...
18
कडक सॅल्यूट! पतीचा मृत्यू झाला पण 'तिने' हार नाही मानली; ई-रिक्षा चालवून भरतेय कुटुंबाचं पोट
19
दारुण पराभवानंतर BCCI चा मोठा निर्णय; उर्वरीत मालिकेसाठी स्टार खेळाडूला मिळाली संधी
20
नात्याला काळीमा! नातवाने त्रिशूळाने वार करून केली आजीची हत्या, शिवलिंगावर रक्ताचा अभिषेक

डोनाल्ड ट्रम्पही आहेत पंतप्रधान मोदींचे चांगले मित्र

By admin | Published: November 15, 2016 12:08 PM

अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले संबंध आहेत, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नमूद केले.

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १५ - अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी माझे चांगले संबंध असून त्यांचा कल भारताच्या बाजूने राहील, असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदींनी व्यक्त केला. ट्रम्प यांच्यासोबत काम करण्यास आपण उत्सुक असल्याचेही त्यांनी नमूद केले. 
सोमवारी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखाली एनडीएच्या घटक पक्षांची बैठक झाली त्यानंतर मोदींनी लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांच्यासह भाजपच्या प्रमुख नेत्यांसोबत भोजन केले. सुमारे एक ते सव्वा तास चाललेल्या या भोजन समारंभात महत्वपूर्ण विषयांवर चर्चा झाली. त्याचदरम्यान उपस्थितांपैकी एका व्यक्तीने मोदींना अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष ट्रम्प यांच्याशी संबंध कसे वाढवणार, असा प्रश्न विचारला असता मोदींनी ट्रम्प व अमेरिकेसोबतच्या संबंधावर भाष्य केले. 
' आपले ट्रम्प यांच्याशी चांगले सख्य असल्याचे ' मोदींनी नमूद केले. तसेच ' (अमेरिकेतील सत्ताबदलानंतर) दोन्ही देशांतील परस्पर संबंधांमध्ये कोणताही मोठा बदल होणार नसल्याचेही' ते म्हणाले.  यावेळी डेमोक्रॅटस व रिपब्लिकन सत्ताधाऱ्यांनी भारत व पंतप्रधानांना दिलेली वागणूक, त्यांचा भारताविषयीचा दृष्टीकोन, माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामांचे कुणाबरोबर चांगले संबंध होते, अशा अनेक मुद्यांवरही चर्चा झाली. अखेर, रिपब्लिकन राजवट भारतासाठी अधिक फायद्याची असल्याचे मत अनेकांनी व्यक्त केले. दरम्यान १९९०च्या दशकाच्या प्रारंभीच्या काळातील भारत- अमेरिकेदरम्यान खडतर संबंधांचाही उल्लेख या चर्चेदरम्यान झाला. त्यावेळी 'अमेरिकेचे राजदूत रॉबिन राफेल यांनी जम्मू-काश्मीरचा उल्लेख "वादग्रस्त भूभाग" असा केल्यानंतर वाद निर्माण झाला होता' या मुद्यावरही बैठकीदरम्यान चर्चा झाली.