डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2025 15:00 IST2025-03-04T14:59:41+5:302025-03-04T15:00:54+5:30

कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. 

Donald Trump decision to impose tariffs on agricultural products; India will also be affected, know how | डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

डोनाल्ड ट्रम्प यांचा कृषी उत्पादनावर टॅरिफचा निर्णय; भारतालाही बसणार फटका, जाणून घ्या कसा

वॉशिंग्टन - अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेल्या निर्णयाचे पडसाद जागतिक पातळीवर उमटत आहेत. त्यात ट्रम्प यांच्या ३ निर्णयाचा फटका भारतालाही बसला आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतलेली भूमिका अमेरिकेच्या लोकांसाठी फायद्याची असली तरी त्यामुळे जागतिक अर्थव्यवस्थेवर त्याचे परिणाम जाणवत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांचे कुठले ३ निर्णय ज्याचा थेट भारतीयांवर परिणाम होतोय त्यातील एक म्हणजे कृषी उत्पादनावर लावलेले टॅरिफचा निर्णय

ट्रम्प यांनी त्यांच्या देशातील शेतकऱ्यांना संबोधित करताना ते अमेरिकेचे महान शेतकरी आहेत असा उल्लेख केला. देशातील शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादने बनवणं सुरू केले पाहिजे असं त्यांनी म्हटलं. त्याशिवाय पुढील महिन्याच्या २ एप्रिलपासून अमेरिकेत येणाऱ्या कृषी उत्पादनावर टॅरिफ वाढवण्याची घोषणा केली. कृषी क्षेत्रात अमेरिकेला आत्मनिर्भर बनवण्याच्या दृष्टीने डोनाल्ड ट्रम्प यांनी हे पाऊल उचलल्याचं सांगितले जाते. 

कृषी उत्पादनावर टॅरिफ वाढवल्यानं काय होणार?

ट्रम्प यांनी बाहेरून येणाऱ्या कृषी उत्पादनावर टॅरिफ वाढवल्याने या वस्तू अमेरिकेत महाग होतील. ज्यातून अमेरिकेत त्यांचा वापर आणि ग्राहकांची संख्या यावर परिणाम होईल. ट्रम्प  यांनी अनेकदा टॅरिफ मुद्द्यावरून भारतावर टीका केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबतच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा उचलला होता. भारत अमेरिकेला मोठ्या प्रमाणात कृषी उत्पादन निर्यात करतो. अमेरिकेला बासमती तांदूळ, साखर, कापूस, मसाला, चहापत्ती यासारखी उत्पादने भारताकडून पाठवली जातात. 

जर अमेरिकेने यावर टॅरिफ वाढवला तर भारतातून आलेला बासमती तांदूळ, मसाला, चहा यांच्या किंमती अमेरिकेत वाढतील. त्याचा परिणाम म्हणून अमेरिकन व्यापारी हा माल भारताकडून मागवणे कमी करतील किंवा बंदही करतील. भारताच्या कृषी उत्पादनासाठी अमेरिका मोठी बाजारपेठ आहे. २०२३-२४ या काळात अमेरिकेला भारताकडून ५.१९ बिलियन डॉलर कृषी निर्यात केले. एप्रिल-जुलै २०२४ या काळात अमेरिकेला ९०,५६८ टन बासमती तांदूळ पाठवण्यात आले. अमेरिका बासमती तांदळाचा भारताचा चौथा मोठा ग्राहक आहे. भारतानेही अमेरिकेतून येणाऱ्या कृषी उत्पादनावर टॅरिफ लावले तर सुका मेवा, फळ या गोष्टी महागतील. टॅरिफ व्यापारी संरक्षणाचं एकतर्फी शस्त्र नाही, त्यामुळे अमेरिकेलाही महागाईचा सामना करावा लागेल.

मॅक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के शुल्क

अमेरिकेने त्यांच्या शेजारील २ देश मॅक्सिको आणि कॅनडावर २५ टक्के टॅरिफची घोषणा केली आहे. त्यामुळे या देशातून अमेरिकेत आयात होणाऱ्या वस्तू महागतील. मात्र ट्रम्प यांचे हे पाऊल भारताची संधी आहे. मॅक्सिको, कॅनडा अमेरिकेला ऑटोमोबाईल, ऑटो पार्ट्स, मशीनरी, ऊर्जा आणि कृषी उत्पादन यांचा पुरवठा करते. टॅरिफ लागल्याने या वस्तू अमेरिकन बाजारात महाग होतील त्याचा फायदा म्हणजे अमेरिकन बाजारात या वस्तूच्या भारतीय उत्पादनाला अधिक बळ मिळेल. अमेरिका भारताच्या ऑटो कॉम्पोनेंटचा एक बाजार आहे. जर मॅक्सिकन ऑटो पार्ट्स अमेरिकेत महागले तर लोक भारतीय उत्पादनाकडे वळतील. 

अमेरिकेने रोखली युक्रेनची मदत

झेलेन्स्की यांच्यासोबत वादानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला मिळणारी अमेरिकन सैन्य मदत थांबवली. आता अमेरिकेशिवाय युक्रेन रशियाविरोधात कितपत टिकेल हे पाहावे लागेल. युरोपने युक्रेनला मदत करण्याची भूमिका घेतली आहे परंतु ट्रम्प यांच्या निर्णयामुळे एनर्जी आणि फूड सप्लाई चेनवर परिणाम होऊ शकतो. युद्धामुळे आधीच युरोपात खाद्य किंमती वाढल्या आहेत. रशिया-युक्रेनच्या दीर्घ काळ चाललेल्या युद्धात भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला आहे. ट्रम्प यांनी युक्रेनची मदत थांबवली तर त्याचा फायदा भारताला होईल. कारण रशियातून येणारा कच्चे तेल, ऊर्जा साहित्य भारताला मिळत राहतील. रशिया मजबूत झाल्यात भारतासाठी ऊर्जा आणि संरक्षण क्षेत्रात विश्वासाचा सहकारी मिळेल. 
 

Web Title: Donald Trump decision to impose tariffs on agricultural products; India will also be affected, know how

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.