अहमदाबाद - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पहिल्या भारत दौऱ्याकडे देशाचे जगाचे लक्ष लागून राहिले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले. त्यावेळी, मी भारत दौऱ्यासाठी उत्साही असून आमचे ग्रँड वेलकम होणार असल्याचे मोदींनी सांगितल्याचं ट्रम्प यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले.
सुमारे 14 तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचले.
* डोनाल्ड ट्रम्प उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेणार आहेत.
* डोनाल्ड ट्रम्प कुटुंबासह प्रेमाचं प्रतीक असलेल्या 'ताजमहाल' येथे दाखल झाले आहे.
* डोनाल्ड ट्रम्प यांनी ताजमहल येथील व्हिजिटर्स बुकमध्ये आपला अभिप्राय नोंदवला
* ताजमाहलच्या भेटीसाठी डोनाल्ड ट्रम्प आग्रा विमानतळावरुन रवाना झाले आहेत.
* डोनाल्ड ट्रम्प यांचे आग्रा विमानतळावर आगमन झाले आहे.
* डोनाल्ड ट्रम्प पत्नीसह अहमदाबादवरुन आग्रासाठी रवाना झाले आहे.
* Donald Trump: चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!
मोदींचं कौतुक करत, एक चहावाला ते बलाढ्य देशाचे पंतप्रधान हा मोदींचा प्रवास वर्णन करताना ट्रम्प यांनी भाषण थांबवून मोदींजवळ जात हस्तांदोलन केले. त्यावेळी, मोदींनाही गहिवरल्यासारखे झाले होते.
* सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली अन् डीडीएलजेचंही कौुतक
* अमेरिकचं भारतावर प्रेम असून भारताचा सन्मान करते - ट्रम्प
* अमेरिका आणि भारताचे घट्ट नातेसंबंध प्रस्थापित झाले आहे - मोदी
* महात्मा गांधींच्या चरख्यावर डोनाल्ड ट्रम्प यांनी सूत कताई केली
* पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि डोनाल्ड ट्रम्प यांचा ताफा साबरमती आश्रमाकडे रवाना
* पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जादू की झप्पी देत नेहमीप्रमाणे डोनाल्ड ट्रम्प यांचं स्वागत केलं.
* डोनाल्ड ट्रम्प यांचे पत्नी मेलानिया यांच्यासह अहमदाबादमध्ये दाखल, जल्लोषात स्वागत
* डोनाल्ड ट्रम्प यांचे हिंदीत ट्विट, मोदींच्या शैलीत भारतीयांना संदेश
* डोनाल्ड ट्रम्प यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबाद विमानतळावर
* काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हांकडून ट्रम्प यांचे स्वागत, अपेक्षाही केल्या व्यक्त
* ट्रम्प दाम्पत्याच्या स्वागतासाठी दिल्लीही सजली, ताजमहलला भेट देणार
* नमस्ते ट्रम्प कार्यक्रमासाठी गुजरातच्या मोटेरा स्टेडियममध्ये नागरिकांची गर्दी
* ट्रम्प यांच्या स्वागतासाठी तिरंगा हातात घेऊन विद्यार्थी जमले
* ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चेतक कमांडोंसह रॅपिड अॅक्शन फोर्स आणि गुजरात पोलिसांची टीम तैनात
* ट्रम्प हे भारत दौऱ्यासाठी रवाना झाले असून सकाळी 11.30 वाजता अहमदाबादला पोहोचतील
सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर ट्रम्प यांचे आगमन होईल. त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी अहमदाबादमध्ये सुरू आहे.