नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्याला अहमदाबादपासून सुरुवात झाली आहे. महात्मा गांधी यांच्या साबरमती आश्रमला भेट देऊन डोनाल्ड ट्रम्प आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी मोटेरा स्टेडियम येथे पोहचले. यावेळी नमस्ते ट्रम्प या कार्यक्रमाला संबोधित करताना डोनाल्ड ट्रम्प यांनी दहशतवादाच्या मुद्द्यावर भाष्य केले.
यावेळी डोनाल्ड ट्रम्प म्हणाले की, दहशतवादाशी लढा देण्यासाठी अमेरिका नेहमी भारताला साथ देईल, पाकिस्तानने त्यांच्या जमिनीवरुन दहशतवाद संपवावा असं अमेरिकेने सांगितले. ट्रम्प यांनी केलेल्या भाषणात जेव्हा पाकिस्तानचा उल्लेख आला त्यावेळी उपस्थित लाखोंच्या जनसमुदायाने जोरदार टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.
भारत आणि अमेरिका दोन्ही देश आपल्या नागरिकांना इस्लामिक दहशतवादापासून वाचवत आहेत. दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटचा उल्लेख करत माझ्या कार्यकाळात अमेरिकेच्या सैन्याला आयएसआयएस विरुद्ध ताकद वापरण्याची सूट दिली आहे. आज आयएसचा खलीफा मारला गेला, राक्षस बगदादी मारला गेलाय असं डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले.
ट्रम्प यांनी पाकिस्तानबाबत सांगितले की, आमच्या नागरिकांवर सुरक्षेला धोका पोहचवणाऱ्यांना मोठी किंमत मोजावी लागेल. प्रत्येक देशाला त्यांच्या सीमेचं रक्षण करण्याचा अधिकार आहे. अमेरिका आणि भारत दहशतवाद आणि दहशतवादी विचारधारेशी लढा देत आहे. माझं प्रशासन पाकिस्तानशी संवाद साधत आहे. पाकिस्तानच्या सीमेतंर्गत दहशतवाद्यांवर कारवाई करायला हवी. आमचे पाकिस्तानशी चांगले संबंध आहेत. पाकिस्तान याबाबतीत योग्य पाऊल उचलेल असं दिसतं. हे पूर्ण दक्षिण आशियाई देशांसाठी गरजेचे आहे. त्यात भारताची भूमिका आणि योगदान महत्त्वाचं असणार आहे.
त्याचसोबत आम्ही सगळ्यात चांगले एअरोल्पेन, रॉकेट, शिप्स, शक्तिशाली हत्यार बनवतो, एरियल वीइकल ३ अरब डॉलर अंतिम टप्प्यात आहे. आम्ही हे हत्यार भारतीय लष्कराला देऊ, अमेरिका भारताचा सर्वात मोठा संरक्षक भागीदार असेल. इंडो पैसिफिक रिजनला सुरक्षित ठेवण्याचं काम अमेरिका आणि भारत करेल असा विश्वास अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी व्यक्त केला. तसेच यावेळी अमेरिकेला भारताबद्दल प्रेम, आदर आणि विश्वास आहे. अमेरिकेच्या हृदयात भारताचं विशेष स्थान असल्याचंही ट्रम्प यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या
डोनाल्ड ट्रम्प यांच्या पर्सनल लाइफमधील या गोष्टींबाबत भारतीय गुगलवर करताहेत सर्च
मोटेरा स्टेडियम उभारलं त्यांनाच 'नमस्ते ट्रम्प' कार्यक्रमाचं आमंत्रण नाही
ज्या सूटमध्ये राहणार तो पाहायचाय?; एका रात्रीची भाडं 'फक्त'....
चहावाला ते पंतप्रधान... चक्क भाषण थांबवून मोदींजवळ गेले ट्रम्प!
कराची दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ठार करण्यासाठी फिल्डिंग लावली, पण...