नवी दिल्ली - अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्रम्प यांचं जोरदार स्वागत केलं. डोनाल्ड ट्रम्प यांच्यासह त्यांच्या पत्नी मेलानिया आणि मुलगी इवांका ट्रम्प देखील भारताच्या दौऱ्यावर आल्या आहेत. मेलानिया आणि इवांका यांच्या कपड्यांना भारतीय टच देण्यात आला आहे. मंगळवारी (25 फेब्रुवारी) इवांका यांनी शेरवानी परिधान केली होती. ही शेरवानी प्रसिद्ध भारतीय फॅशन डिझायनर अनिता डोंगरे यांनी डिझाईन केली आहे. पण यावरून अनेकांनी अनिता यांच्यावर टीका केली आहे.
इवांका यांनी परिधान केलेल्या शेरवानीच्या प्रकाराचं सुरूही शेरवानी असं नाव आहे. या शेरवानीमध्ये इवांका खूपच सुंदर दिसत होत्या. पश्चिम बंगालमध्ये याची शिलाई करण्यात आली असून ती प्युअर सिल्कने तयार करण्यात आली आहे. अनिता डोंगरे यांनीच याबाबत माहिती दिली आहे. अनिता यांनी आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर इवांका यांचा शेरवानीतील एक सुंदर फोटो ट्विट केला आहे. या शेरवानीचं स्टाइल स्टेटमेंट वाढवणाऱ्या फ्रंट बटन्सवर अनिता डोंगरेंच्या ब्रँड सिग्नेचर एलिफंटचा लोगो आहे.
वेबसाईटवर या ड्रेसची किंमत ही तब्बल 82,400 रुपये दाखवण्यात येत आहे. अनिता यांच्या शेरवानीचं अनेकांनी कौतुक केलं आहे. तर काहींनी त्यांच्यावर टीका करायला सुरुवात केली आहे. इवांकासाठी ड्रेस डिझाईन करायला नको होता असं काहींचं म्हणणं असल्याने त्यांनी अनिता डोंगरे यांना अनफॉलो देखील केलं आहे. जो ब्रँड डायव्हर्सिटीला सेलिब्रेट करतो, तो त्या उलट विचारधारा असणाऱ्यांचे कपडे तयार करत आहे. असं अनेकांनी म्हटलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यामध्ये मंगळवारी हैदराबाद हाऊसमध्ये द्विपक्षीय चर्चा झाली. ज्यात तीन अब्ज डॉलरच्या संरक्षण करारावर दोन्ही देशांच्या प्रमुखांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत. दोन्ही जागतिक स्तरावरच्या नेत्यांनी एकसुरात दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्या देशांवर निशाणा साधला. पाकिस्तानच्या जमिनीवरून पोसला जाणाऱ्या दहशतवादाला लगाम घालणं आवश्यक आहे. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पंतप्रधान मोदी आणि दोन्ही देशांमधील मजबूत झालेल्या संबंधांचा उल्लेख केला आहे. भारताचा हा अभूतपूर्व दौराही कधी विसरणार नसल्याचं त्यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच त्यांनी भारतीयांनी केलेल्या शानदार स्वागतासाठी आभारही व्यक्त केले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
अमेरिका भारताला देणार '4G' सुरक्षा कवच; जाणून घ्या, काय आहे हे अस्त्र!
Donald Trump Visit Live: भारत अमेरिकेतील संरक्षण करारावर शिक्तामोर्तब, ट्रम्प आणि मोदींची घोषणा
धक्कादायक! तब्बल 12 तास हायवेवर पडून असलेला मृतदेह हजारो गाड्यांनी चिरडला अन्...
Delhi Violence : दिल्लीतील हिंसाचाराची आग थांबेना, मृतांचा आकडा पोहोचला सातवर
Delhi Violence: तू हिंदू आहेस की मुसलमान?; दिल्ली हिंसाचारात पत्रकाराला विचारला प्रश्न, मग...