अहमदाबाद : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. त्यांच्या या भारत दौऱ्याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. अमेरिकेतील मेरिलँड राज्यातील लष्करी तळावरून डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांच्यासोबत येणारे कुटुंबीय व वरिष्ठ मंत्री आणि अधिकाऱ्यांचे प्रतिनिधी मंडळ शनिवारी रात्री रवाना झाले.
जवळपास 14 तासांचा प्रवास करून त्यांचे ‘एअर फोर्स वन’ हे खास विमान सोमवारी सकाळी 11.30 वाजता अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर पोहोचणार आहे. दरम्यान, डोनाल्ड ट्रम्प यांच्या भारत दौऱ्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांना रिट्विट केले आहे. यामध्ये नरेंद्र मोदींनी लिहिले आहे की, "भारत आपल्या दौऱ्याची वाट पाहत आहे. हा दौरा निश्चितच आपल्या देशांमधील मैत्री आणखी दृढ करेल. लवकरच आपली अहमदाबादमध्ये भेट होईल."
डोनाल्ड ट्रम्प हे भारताला भेट देणारे अमेरिकेचे सातवे राष्ट्राध्यक्ष आहेत. याआधी प्रत्येकी पाच वर्षांच्या अंतराने अनुक्रमे बिल क्लिंटन, जॉर्ज डब्ल्यू बुश व बराक ओबामा या राष्ट्राध्यक्षांनी भारताचा दौरा केला होता. इतरांच्या आणि डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्यात दोन बाबतीत लक्षणीय फरक आहे. इतरांनी भारतासोबत पाकिस्तान किंवा शेजारच्या अन्य देशांनाही भेटी दिल्या होत्या. डोनाल्ड ट्रम्प मात्र फक्त भारताचा दौरा करणार आहेत. दुसरे असे की, इतर राष्ट्राध्यक्षांचे दौरे शासकीय व राजनैतिक पातळीवरचे होते.
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एकूण 36 तासांच्या भारत दौऱ्यात मात्र या अधिकृत कामांसाठी ठेवलेला वेळ जेमतेम तीन तासांचा आहे. यापैकी मंगळवारी दुपारी दिल्लीत डोनाल्ड ट्रम्प व नरेंद्र मोदी यांच्यात सुमारे दीड तास अधिकृत भेट व चर्चा होईल. डोनाल्ड ट्रम्प प्रथमच भारतात येत असले तरी मोदी चार वेळा अमेरिकेला गेले तेव्हा व तीन वेळा अन्य निमित्ताने दोघांची भेट झालेली असून दोन्ही नेत्यांमधील व्यक्तिगत ‘रॅपो’ हे या दौ-याच्या यशापयशाचे मुख्य गमक असणार आहे.
कसा असेल कार्यक्रम?सोमवारस. ११.४० । अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल विमानतळावर आगमनदु. १२.१५ । साबरमती आश्रमास भेटदु. १.०० । मोटेरा क्रिकेट स्टेडियममध्ये ‘नमस्ते ट्रम्प’ कार्यक्रमदु. ३.३० । आगऱ्याकडे रवानासा. ५.३० । ताजमहालला भेटसा.६.४५ । दिल्लीकडे प्रस्थानसा. ७.३० । दिल्लीत आगमन
मंगळवारस.१०.०० । राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात समारंभपूर्वक स्वागतस.१०.३० । राजघाटावर राष्ट्रपिता महात्मा गांधींना आदरांजलीस.११.०० । हैदराबाद हाऊसमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी भेटदु. १२.४० । हैदराबाद हाऊसमध्ये करारांवर स्वाक्षºया व वृत्तपत्रांना निवेदनसा. ७.३० । राष्ट्रपती भवनात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याशी भेटरा. ८.०० । मायदेशाकडे प्रयाण
महत्त्वाच्या बातम्या
मोदी सरकारच्या कामांची पाहणी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष कधी करणार?; शिवसेनेचा टोला
कराची दर्ग्याबाहेर अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला ठार करण्यासाठी फिल्डिंग लावली, पण...
ट्रम्प यांच्या सुरक्षेसाठी चेतक कमांडोंसह RAF तैनात
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प आजपासून भारत दौऱ्यावर; अहमदाबादमध्ये जय्यत तयारी