ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - अमेरिकेतील राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीचे जोरदार पडसाद बुधवारी मुंबई शेअर बाजारात उमटले. मुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकमध्ये २८० पेक्षा जास्त अंकांची घसरण झाली. बीएसई सेन्सेक्स २७,५८८ अंकांवर आला होता. सकाळच्या सत्रात व्यवहाराला सुरुवात होताच ही घसरण झाली.
राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी सुद्धा ८६०० च्या खाली आला. अमेरिकेत मतदानपूर्व सर्वेक्षणात डोनाल्ड ट्रम्प यांनी प्रतिस्पर्धी उमेदवार हिलरी क्लिटंन यांच्यावर आघाडी घेतल्याचे बाजारात नकारात्मक पडसाद उमटले. शेअर बाजाराची अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदासाठी डेमोक्रॅटिक उमेदवार हिलरी क्लिंटन यांना पसंती आहे.
धातू, तेल आणि रिअॅलिटी कंपन्यांच्या शेअर्समध्ये घसरण झाली. ओपिनयिन पोलनुसार डोनाल्ड ट्रम्प हिलरी यांच्या पेक्षा किंचित पुढे आहेत. भारतातच नव्हे जगातील अन्य शेअर बाजारातही याचे पडसाद उमटले.