Dunky Flight : ( Marathi News ) - काही दिवसांपूर्वी मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रेंच अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतल्यानंतर तीन दिवसांनी ३०० प्रवाशांना घेऊन एक विमान मुंबई विमानतळाकडे रवाना झाले आहेत. यात बहुतांश प्रवासी भारतीय होते. या प्रकरणी आता मोठा खुलासा झाला आहे.
रोमानियाच्या 'लिजेंड एअरलाइन्स' कंपनीचे एअरबस A-340 विमान मानवी तस्करीच्या संशयावरून फ्रान्समधील व्हॅट्री विमानतळावर चार दिवसांसाठी ताब्यात घेण्यात आले. या विमानात एकूण ३०३ भारतीय प्रवासी होते. त्यापैकी २७६ प्रवासी २६ डिसेंबर रोजी मुंबई विमानतळावर उतरले. उर्वरित २७ प्रवासी फ्रान्समध्येच राहिले कारण त्यांनी तेथे आश्रयासाठी अर्ज केला होता. हे विमान दुबईहून निकाराग्वाला जात होते. विमानात बसलेल्या भारतीय प्रवाशांपैकी एक तृतीयांश गुजराती होते.
तुर्कस्तानच्या खेळाडूंच्या जर्सीवरील फोटोमुळे वाद! सौदीने फुटबॉलचा फायनल सामनाच रद्द केला
गुजरातच्या सीआयडी क्राईमच्या पथकाने ३० प्रवाशांची चौकशी केली, यात त्यांनी अमेरिकेला जाण्यासाठी एजंट्सशी ४० लाख ते १.२५ कोटी रुपयांचे सौदे केल्याचे उघड झाले. सीआयडी क्राईम उद्या उर्वरित प्रवाशांची चौकशी करू शकते. आतापर्यंत प्रवाशांच्या चौकशीत सीआयडीने ६ एजंटांची माहिती घेतली आहे. अद्याप चौकशी झालेली नाही.
सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, ज्या प्रवाशांची चौकशी करण्यात आली ते आपली फसवणूक झाल्याचे सांगत नाहीत आणि कोणाच्या विरोधात काहीही बोलायला तयार नाहीत. त्यांना निकाराग्वाचा टुरिस्ट व्हिसा मिळाला आहे. ते फिरायला निघाले होते, असे प्रवासी सांगतात. गुजरातमधील मेहसाणा, गांधीनगर, बनासकांठा, आणंद जिल्ह्यातील प्रवासी १४ डिसेंबरपासून दुबईला पोहोचले. हे सर्वजण निकाराग्वाला विमानात बसले. सीआयडीने दिलेल्या माहितीनुसार, हे लोक निकाराग्वाहून अमेरिकेला जात होते.
सर्वांकडे टुरिस्ट व्हिसा
सीआयडीने सांगितले की, त्यांच्याकडे टुरिस्ट व्हिसा होता, मात्र हे सर्वजण नोकरीसाठी अमेरिकेला जात होते. हे प्रवासी अमेरिकेत कसे प्रवेश करू शकले आणि या बेकायदेशीर कामात त्यांना कोण साथ देत होते, याचा तपास सुरू आहे. त्यांचे पैसे बुडतील याची भीती या प्रवाशांना आहे यामुळे त्यांनी अजुनही एजंटांची नावे सांगितलेली नाहीत. मानवी तस्करीच्या या प्रकरणाचा तपास करण्यासाठी गुजरातच्या सीआयडी क्राईमने चार पथके तयार केली आहेत.