ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2021 09:30 AM2021-07-24T09:30:59+5:302021-07-24T09:42:29+5:30
donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
नवी दिल्ली - देशभरात चांगला पाऊस पडावा यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. अनेक खेड्यांमध्ये आजही यंदा पाऊस उत्तम पडावा म्हणून चित्र-विचित्र प्रकार केले जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातही अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खूश करण्यासाठी गावच्या सरपंचांना थेट गाढवावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांना आशा आहे.
गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. याच दरम्यान विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी गोष्ट करण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा यांना गाढवावर बसवून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं. हार घालून त्यांची खास गाढवावरून मिरवणूकचं काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले होते.
गाढवावर बसलेल्या सरपंचाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात होतं. गावातील लोक त्यांची आरती करत होते. महिला, लहान मुलांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सरपंच गाढवावर बसले असून लोक बँड-बाजा घेऊन नाचत गात असलेले पाहायला मिळाले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही मिरवणूक पटेल बाबा देवस्थान येथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या देवाकडे प्रार्थना केली. काही ठिकाणी उत्तम पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावण्याची देखील पद्धत आहे.
सरपंच सुशील वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात असं मानलं जातं, की गावच्या सरपंचांची गाढवावरून मिरवणूक काढल्यास इंद्रदेवता प्रसन्न होतात आणि पाऊस चांगला होतो. याच कारणामुळे गाढवावरून सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं काम आहे. तसेच चांगल्या पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सरपंचांनी म्हटलं आहे. तर काही गावकऱ्यांनी असं केल्यास पाऊस येतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
AIIMS च्या डॉक्टरांची कमाल; रुग्णाला बेशुद्ध न करताच केली सर्जरी #AIIMS#Hospital#Doctor#Indiahttps://t.co/b7xNpaESe2
— Lokmat (@MiLOKMAT) July 24, 2021