शहरं
Join us  
Trending Stories
1
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
2
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
3
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
4
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
5
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
6
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
7
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
8
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
9
विमानात अमेरिकन महिलेचा श्वास गुदमरू लागला, देवदूत बनून धावली काँग्रेसची महिला नेता आणि वाचवले प्राण   
10
रेपो रेट कपातीनंतरही FD वर बंपर रिटर्न! SBI मध्ये २ लाख जमा करून मिळेल ८३,६५२ रुपये निश्चित व्याज
Daily Top 2Weekly Top 5

'मोदीजी घाबरू नका, चीननं जमिन बळकावल्याचं सत्य देशवासियांना सांगा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2020 16:47 IST

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला

नवी दिल्ली - केंद्रातील नरेंद्र मोदी सरकारने चीनसमोर सपशेल शरणागती पत्करली आहे. चीनने २० भारतीय जवानांना हालहाल करुन मारले तरीही मोदी सरकार गप्पच आहे. दुसरीकडे सारा देश कोरोनाच्या गंभीर संकटाचा सामना करत असताना सातत्याने पेट्रोल-डिझेल दरवाढ करुन जनतेला महागाईच्या खाईत लोटण्याचा उद्योग सुरु आहे, असे म्हणत काँग्रेसने आज देशभरात 'शहिदों को सलाम दिवस पाळला' आहे. यावेळी, काँग्रेस नेते राहुल गांधींनी पुन्हा एकदा मोदींना लक्ष्य केले. 

चीनने सीमेवर आगळीक करून आपले २० जवान मारले. मोदी सरकारने देशाला विश्वासात न घेता माहिती दडवण्याचा प्रयत्न केला तसेच चीनी सैन्याने सीमा ओलांडली नाही अशी चीनला फायदा होणारी भूमिका घेऊन मोदींनी देशाचा तसेच आपल्या शहीद जवानांचा अपमान केल्याचे काँग्रेसने यापूर्वी म्हटले होते. लडाख सीमारेषेवरील तणावाचा आणि केंद्र सरकारच्या कुचकामी धोरणाबद्दल जाब विचारण्यासाठी काँग्रेसने देशव्यापी आंदोलन छेडले आहे. भारताच्या २० वीर शहीद जवानांप्रती आदरभावना व्यक्त करण्यासाठी आज २६ जूनला ‘शहिदों को सलाम’ दिवस पाळण्यात आला. राष्ट्रपिता महात्मा गांधींचा पुतळा, शहीद स्मारक किंवा स्वातंत्र्यसैनिकांच्या स्मारकासमोर एकत्र येऊन मेणबत्या पेटवून शहिदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. कोणतीही घोषणाबाजी न करता शांततेने हे आंदोलन केले जाणार आहे. तसेच याच दिवशी #SpeakupForOurMartyrs  ही ऑनलाईन मोहीमही सोशल मीडियावर पाहायला मिळाली. काँग्रेसच्या या आंदोलनानंतर राहुल गांधींनी मोदींना प्रश्न केला आहे. 

भारत-चीन सीमारेषेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देश भारतीय सैन्य आणि सरकारसोबत आहे. पंतप्रधान मोदींनी सांगितले की देशाची १ इंच जमिनही कुणी घेतली नाही, कुणीही भारताच्या हद्दीत प्रवेश केला नाही. सॅटलाईट फोटोग्राफच्या माध्यमातून दिसून आलंय, लोकंही तसंच म्हणतायंत, लडाखची जनता सांगत आहे, आर्मीचे निवृत्त अधिकारीही सांगत आहेत की, चीनने आपली जमिन बळकावली आहे, केवळ एक जागेवर नाही तर तीन जागेवर चीनने जमिन बळकावली आहे. त्यामुळे, पंतप्रधान मोदींनी सत्य सांगायलाच हवं, देशाला खरं कळायलाच हवं. मोदींनी घाबरायचं काहीही कारण नाही, जर तुम्हीच म्हणाल की जमिन गेली नाही, मात्र, खरंच जमिन गेली असेल तर चीनचा फायदा होईल. आपण एकत्र येऊन ही लढाई लढायची आहे. त्यामुळे, न घाबरता तुम्ही सांगा की चीनने आपली जमिन बळकावली आहे, असे राहुल गांधींनी एका व्हिडिओच्या माध्यमातून म्हटले आहे.   

टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीNarendra Modiनरेंद्र मोदीcongressकाँग्रेसchinaचीनBorderसीमारेषा