- बलवंत तक्षक
चंदीगड : पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी नवा पक्ष स्थापण्याची घोषणा करताच उपमुख्यमंत्री सुखजिंदर सिंग रंधवा यांनी त्यांच्या पाकिस्तानी मैत्रीणीचा पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंध आहे का, याची चौकशी करण्याची घोषणा केली. पण मुख्यमंत्री चरणजितसिंग चन्नी यांना खासगी आयुष्यातील ही ढवळाढवळ आवडलेली नाही.कॅप्टन यांनी अरुसा आलम ही आपली मैत्रीण असल्याचे, ती पाकिस्तानी असल्याचे लपवून ठेवले नाही.. असे असताना नवा पक्ष स्थापन करताच, हे प्रकरण उकरून काढणे अयोग्य आहे, असे ते म्हणाले.
चौकशी हवीच - राजा वडिंगपरिवहनमंत्री अमरिंदर सिंग राजा वडिंग यांना मात्र मुख्यमंत्र्यांचे म्हणणे मान्य नाही. ते म्हणाले की, नवज्योत सिद्धू पाकिस्तानातील अधिकारी, नेते यांना भेटले म्हणून देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण झाल्याचे कॅप्टन म्हणत. त्याच न्यायाने त्यांच्या मैत्रिणीमुळेही देशाला सुरक्षेला धोक्याची भीती आहे. ती पाक गुप्तचर यंत्रणेशी संबंधित असू शकते. त्यामुळे चौकशी व्हायलाच हवी.
(कोण आहेत अरुसा आलम? ज्यांच्यामुळे पंजाब काँग्रेस -अमरिंदर सिंग यांच्यात रंगलाय वाद)