नवी दिल्ली: दिल्लीमध्ये प्रदुषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळे दिल्लीकरांनी दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचा सल्ला केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी दिला आहे. तसेच प्रदूषण कमी करण्यासाठी सरकार अनेक निर्णय घेत असल्याचे देखील प्रकाश जावडेकर यांनी स्पष्ट केले.
प्रकाश जावडेकरांनी सांगितले की, दिल्लीमध्ये 2006 नंतर प्रदूषण मोठ्या प्रमाणात वाढत गेले. 2014 पर्यत प्रदूषणावर काहीच उपाय करण्यात आले नाही. मात्र सरकारने विविध उपायांवर विचार करुन प्रदूषणाण कमी करण्यासाठी अनेक निर्णत घेतले आहेत. तसेच दिल्लीमध्ये आजपासून (दि.7) 46 विशेष पथके रस्त्यावर उतरणार असल्याचे देखील त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
प्रदूषणात आधीच वाढ असतानाच दिवाळीमध्ये फटाके न फोडण्याचे आवाहन देखील त्यांनी दिल्लीकरांना केले आहे. मुलांनी सुध्दा स्वत:हून आमच्यासाठी फटाके खरेदी करु नका असं पालकांना सांगायला हवे आणि जर मुलांना फटाके फोडायचेच असतील तर ग्रीन फटाके फोडावे अशी विनंती देखील प्रकाश जावडेकरांनी केली आहे.