कॅमेऱ्याच्या मध्ये येऊ नकोस रे... पंतप्रधान नरेंद्र मोदींचा व्हिडिओ व्हायरल
By महेश गलांडे | Published: November 1, 2020 05:06 PM2020-11-01T17:06:37+5:302020-11-01T17:07:17+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या
मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचासोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. मोदींच्या सभेतील किंवा एखाद्या ठिकाणी पाहणी दौऱ्यातील फोटो नेहमीच व्हायरल होत असतात. आताही, मोदींच्या गुजरात दौऱ्यातील एक व्हिडिओ व्हायरल झाला असून काँग्रेस आमदार भाई जगताप यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, या व्हिडिओसोबत मोदींना ड्रामेबाज अशी उपमाही त्यांनी दिलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सध्या बिहार विधानसभा निवडणुकांच्या दौऱ्यावर आहेत. बिहारमधील विविध जिल्ह्यात त्यांच्या सभांचं आयोजन करण्यात आलंय. त्यातच, मोदींनी २ दिवसीय गुजरात दौराही केला. याच दौऱ्यात अनेक ठिकाणी मोदींनी भेटी दिल्या. दरम्यानच्या भेटीमधील एका ठिकाणचा मोदींचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. काँग्रेस आमदार भाई जगताप यांनीही मोदींचा हा व्हिडिओ आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन शेअर केला असून मोदींना ड्रामेबाज असं म्हटंलय. या व्हिडिओत कॅमेऱ्याच्या मध्ये आलेल्या व्यक्तीस मोदींनी बाजूला होण्यास सांगितल्याचं व्हिडिओत दिसून येत आहे. त्यानंतर, मोदींच्या पाठिमागील व्यक्ती त्या मध्ये आलेल्या व्यक्तीस आणखी पाठिमागे ओढते आणि कॅमेरा दाखवते. त्यामध्ये हे सर्व चित्रीकरण झालं आहे. मोदींना कॅमेऱ्याच्यामध्ये कुणीही आलेलं आवडत नाही, असं म्हणत सोशल मीडियावर हा व्हिडिओ शेअर केला जात आहे.
कॅमेऱ्याच्या मध्ये नको येऊस रे, समजत नाही का तुला❓ 🤔
— Bhai Jagtap - भाई जगताप (@BhaiJagtap1) October 31, 2020
ड्रामेबाज❗ pic.twitter.com/p9G5HAYpQE
दरम्यान, यापूर्वीही मोदींच्या फेसबुक भेटीदरम्यानचा व्हिडिओ व्हायरला झाला होता, त्यामध्ये मार्क झुकरबर्गलाही मोदींनी अशाचप्रकारे कॅमेरा आणि स्वत:मधील अडथळा होऊ नको, म्हणून बाजूला केल्याचं दिसून येत होतं.