शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
2
"...तर बाळासाहेबांनी उद्धव ठाकरेंना गोळ्या घातल्या असत्या"; नारायण राणेंचं विधान
3
सध्यातरी इतकेच महायुतीत ठरले...; अमित शाह यांच्या मुख्यमंत्री नावाच्या दाव्यावर प्रफुल्ल पटेलांची प्रतिक्रिया
4
"अरे देवा...", राहुल-अथियाने दिली गुडन्यूज; सूर्यकुमारची पत्नी देविशाच्या कमेंटनं मात्र वेधलं लक्ष
5
Maharashtra Election 2024: गडचिरोलीत किती ही बंडखोरी; कोणाच्या हाती आमदारकीची दोरी?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
7
Maharashtra Election 2024: लोकसभेला 62 पैकी 43 मतदारसंघात काँग्रेसला मताधिक्य; विदर्भातील लढतीचं गणित कसं?
8
AUS A vs IND A : ऑस्ट्रेलियात टीम इंडियाविरुद्ध चिटिंग? व्हिडिओ होतोय व्हायरल
9
सीबीआयने अधिकाऱ्याला लाच घेताना पकडले, घरात धाड टाकली, रोकडचा डोंगर सापडला
10
चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानात होईल आणि भारतही येईल, आता कमीपणा नाही; PCB अध्यक्षांची प्रतिक्रिया
11
'आम्ही भारताला फक्त शस्त्र विकत नाही, आमचं नातं विश्वासावर टिकून आहे', पुतिन स्पष्ट बोलले
12
Athiya Shetty-K L Rahul: अथिया शेट्टीने दिली गुडन्यूज, लग्नानंतर एका वर्षातच पाळणा हलणार; शेअर केली पोस्ट
13
सरन्यायाधीशांचा आज शेवटचा वर्किंग डे; सुप्रीम कोर्टात 'असं' काय घडलं, सगळेच हसले
14
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
15
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
16
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
17
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
18
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
19
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
20
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले

Covavax vaccine: सीरमला मोठा झटका! कोवोव्हॅक्स लसीच्या मुलांवरील चाचण्यांना परवानगी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 01, 2021 9:14 AM

Covavax vaccine trials: सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मुलांवर कोवोव्हॅक्स लसीच्या चाचणीची परवानगी मागितली होती.

कोव्हिशिल्डमुळे मोठ्या प्रमाणावर चर्चेत आलेल्या पुण्याच्या सीरम इन्स्टीट्यूटला (Serum Institute of India) मोठा झटका बसला आहे. २ ते १७ वर्षांच्या मुलांवर कोवोव्हॅक्स व्हॅक्सिनच्या (Covavax vaccine) दुसऱ्या आणि तिसऱ्या चाचणीला परवानगी न देण्याची शिफारस सरकारी समितीने केली आहे. सीरमने ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे मुलांवर लसीच्या चाचणीची परवानगी (corona vaccination trial on child.)  मागितली होती. कोरोनाची तिसरी लाट मुलांना सर्वाधिक प्रभावित करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे लहान मुलांच्या लसीवर वेगाने काम केले जात आहे. (Government panel recommends against allowing Serum Institute of India to conduct phase 2 & 3 clinical trials of Covavax #COVID19 vaccine on children of age 2-17 years: Sources)

Covishield: कोव्हिशिल्डच्या तिसऱ्या डोसची गरज आहे का? ऑक्सफर्डकडून नवे संशोधन सादर...

सरकारी समितीने सीरमला ही परनागी देण्यात येवू नये अशी शिफारस केली आहे. ही शिफारस मान्य केली जाईल की धुडकावली जाईल हे आताच सांगणे कठीण आहे. कदाचित सरकारी समितीने नोंदविलेले आक्षेप दूर करण्यासाठी सीरमला सांगितले जाईल. सुत्रांनी सांगितले की, सीडीएससीओच्या कोरोना संबंधीत तज्ज्ञांच्या समितीला असे आढळले की, या लसीला अद्याप कोणत्याच देशाने मान्यता दिलेली नाही. 

समितीने सांगितले की, सीरमने मुलांवर कोवोव्हॅक्स लसीच्या चाचणीची परवानगी मागण्याआधी या लसीचे प्रौढांवर झालेले परिणाम आणि चाचण्यांचा डेटा सादर करणे गरजेचे होते. प्रौढांवर या लसीच्या चाचणीची परवानगी डीसीजीआयने दिली आहे. मात्र, या लसीच्या परिणामांचा डेटा सादर न करता सीरमने लहान मुलांवरही चाचणी करण्याची परवानगी मागितल्याने हा आक्षेप घेण्यात आला आहे. 

दुसरीकडे तिसऱ्या चाचणीचा टप्पा पार केलेल्या झायडस कॅडिलाने डीसीजीआयकडे १२ वर्षांवरील मुलांसाठी डीएनए लसीच्या आपत्कालीन वापराची परवानगी मागितली आहे.

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लस