शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
2
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
3
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
4
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू
5
पाठिंबा दिलेल्या अपक्ष उमेदवाराला वंचितने दिले चाबकाचे फटके, काळेही फासले; असे का घडले...
6
IND vs AUS: टीम इंडियात बदल होणार? संघात या दोघांना मिळू शकते 'वाइल्ड कार्ड' एन्ट्री
7
दिलीप वळसे, मुश्रीफांना पाडण्याचे शरद पवारांचे आवाहन; अजितदादांवर म्हणाले, "तिथं काय बोलणार..."
8
भाजपानं घोषित केलेली 'भावांतर योजना' गेमचेंजर ठरणार?; शेतकर्‍यांची चिंता मिटणार
9
पत्रकार गुलाम आहेत; अमरावतीच्या सभेत राहुल गांधींचं विधान; पत्रकारांनी व्यक्त केला संताप
10
'बंटोगे तो कटोगें'वर कंगना यांचा घुमजाव; आधी म्हणाली, "हा विरोधकांचा मुद्दा" अन् नंतर...
11
भाजपच्या किती जागा येणार? जयंत पाटलांनी सांगितला आकडा; केली मोठी भविष्यवाणी!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : शिराळा विधानसभेत टफ फाईट! सत्यजीत देशमुख की मानसिंगराव नाईक,कोण मारणार बाजी?
13
भारताने ब्रिटनच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकले! माजी पंतप्रधान लिज ट्रस म्हणाल्या, "पश्चिमात्य देशांची प्रतिष्ठा संकटात"
14
त्यांना बॅगा, खोके पुरत नाहीत, कंटेनर लागतो; एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्ला
15
धारावीची जमीन अदानींना द्यायची होती म्हणून सरकार चोरले; राहुल गांधींचा भाजपवर आरोप
16
'मिस्टर इंडिया'तील ही क्युट टीना आठवतेय का? आता तिला ओळखणं झालंय कठीण
17
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :वाईतील सभेत शरद पवारांना अचानक एक चिठ्ठी आली,पवारांनी वाचूनच दाखवली, म्हणाले,...
19
वडील घरी न आल्याने अमेरिकेतील मुलांनी आयफोनने अहमदाबादचं लोकेशन केलं ट्रॅक अन्...
20
प्रियांका गांधी यांच्याकडून भरसभेत बाळासाहेब ठाकरे यांचा उल्लेख; PM मोदी, अमित शाह यांना मोठं आव्हान

केवळ सिनेकलावंतांच्या मागे हात धुऊन लागू नका; गृह मंत्रालयाचे एनसीबीला आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: October 11, 2020 3:01 AM

NCP Bollywood Drugs News: अमली पदार्थांचे तस्कर, विक्रेत्यांवर कारवाई करण्याच्या सूचना

हरीश गुप्ता नवी दिल्ली : अमली पदार्थांचे व्यसन करणाऱ्या चित्रपट अभिनेत्यांपेक्षा त्या पदार्थांचे विक्रेते व संघटित टोळीवर कारवाई करण्याकडे अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्र सरकारने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोला (एनसीबी) दिला आहे. त्यामुळे या प्रकरणात चित्रपट कलाकारांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमधील ड्रग्ज प्रकरण समोर आले होते. आणखी काही बड्या कलाकारांना एनसीबी चौकशीस बोलाविणार असल्याचे वृत्त वृत्तवाहिन्यांवर झळकले होते. त्याचा एनसीबीने इन्कार न केल्याने कलाकारांमध्ये काहीसे घबराटीचे वातावरण होते. अमली पदार्थ प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्ती व सुशांतसिंह राजपूत याचे काही सहकारी यांच्यासह सुमारे १२ लोकांना एनसीबीने अटक केली आहे. ड्रग्ज टोळीचे सदस्य नसलेल्या व केवळ ते सेवन करत असल्याचा संशय असलेल्या कलाकारांना चौकशीच्या निमित्ताने सळो की पळो करून सोडू नये. त्यापेक्षा ड्रग्जची तस्कर, विक्री करणाऱ्यांना जेरबंद करण्यावर अधिक लक्ष द्यावे, असा आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने एनसीबीला दिला आहे.कोणत्याही राजकीय लाभाची शक्यता नाहीसुशांतसिंहची गळा दाबून हत्या झाली नसल्याचा निर्वाळा एम्समधील डॉक्टर सुधीर गुप्ता यांनी दिला आहे. या अभिनेत्याने आत्महत्याच केली असा निष्कर्ष गुप्ता यांनी अहवालात मांडला आहे. सुशांतच्या बँक व्यवहारांत मनी लाँडरिंगचा संबंध नसल्याचे अंमलबजावणी संचालनालयाला आढळून आले आहे. या प्रकरणामध्ये चित्रपट कलाकारांची चौकशी करून, कारवाई करून त्यातून भाजपला कोणताही राजकीय लाभ होण्याची शक्यता नसल्याचे पक्षातील काही नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना कळविले आहे.

 

टॅग्स :Home Ministryगृह मंत्रालयDrugsअमली पदार्थNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोbollywoodबॉलिवूडBJPभाजपाSushant Singh Rajputसुशांत सिंग रजपूत