शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
2
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
3
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
4
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
5
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
6
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
7
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
8
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
9
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
10
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
11
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!
12
देव तारी त्याला कोण मारी! चालत्या ट्रेनमधून पडलेल्या प्रवाशाचा आरपीएफ जवानाने वाचवला जीव
13
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
ट्रम्प विजयाबरोबरच सोन्याचे 'अच्छे दिन' संपले, दिसून आली 3 वर्षातील सर्वात मोठी घसरण! आता खरेदी करायला हवं की नको?
15
'चूक झाली, यापुढे इकडे-तिकडे जाणार नाही', सीएम नितीश कुमारांचा पीएम मोदींना शब्द
16
शशांक केतकर आणि मृणाल दुसानिस तब्बल ४ वर्षांनंतर पुन्हा एकत्र, त्यांची गाजलेली ही मालिका पुन्हा भेटीला
17
Maharashtra Election 2024: राहुल गांधींच्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी तीन घोषणा!
18
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
19
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
20
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान

कोरोना पसरु देऊ नका, यंत्रणा सुसज्ज ठेवा : नरेंद्र माेदी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 23, 2023 6:53 AM

मागील चोवीस तासांत देशात १३१४ नवे रुग्ण आढळले, तर सक्रिय रुग्णसंख्या ७०२६वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली.

नवी दिल्ली : भारतात कोरोना रुग्ण वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला. कोरोनाचा अधिक फैलाव होऊ नये म्हणून दक्ष राहण्याचे, तसेच कोरोना मुकाबला करण्यासाठी आरोग्य यंत्रणा सुसज्ज राखण्याचे निर्देशही अधिकाऱ्यांना दिले.

कोरोना स्थितीचे अचूक निदान होण्यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग वाढवावे, असेही आदेश पंतप्रधान मोदी यांनी दिले आहेत. देशात एच१एन१ व एच३एन२ या विषाणूंमुळे इन्फ्लुएन्झा तापाच्या रुग्णांची संख्या वाढली आहे. त्याची माहितीही मोदी यांनी या बैठकीत घेतली.  मागील चोवीस तासांत देशात १३१४ नवे रुग्ण आढळले, तर सक्रिय रुग्णसंख्या ७०२६वर पोहोचली आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य खात्याने दिली.

ठाण्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यूजिल्ह्यात नव्या कोरोना रुग्णांची संख्या कमी होण्याचे नाव घेत नाही. बुधवारी दिवसभरात ठाणे जिल्ह्यात तब्बल ७१ नव्या रुग्णांची नोंद झाली आहे, तर ठाणे शहरात एकाचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. वाढत्या रुग्णसंख्येने जिल्ह्यात सक्रिय रुग्णांचा आकडा हा ३०६ वर गेला आहे. त्यातील २०६ सक्रिय रुग्ण हे एकट्या ठाणे महापालिका हद्दीत आहेत. तर आठवडाभरात ठामपा हद्दीत कोरोनाचा तिसरा बळी गेला आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीcorona virusकोरोना वायरस बातम्या