शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
2
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
3
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
4
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
5
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
6
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
7
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
8
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
9
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
10
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
11
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
12
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
13
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
14
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!
15
अजित पवारांविरोधात उमेदवार देण्याचं शरद पवारांनी सांगितलं वेगळंच कारण; काय बोलले?
16
माइक टायसनचे 19 वर्षांनंतर कमबॅक, एका फाइटसाठी मिळणार तब्बल 168 कोटी रुपये
17
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
18
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
19
रॅडिको कंपनीत स्टोरेज टाकीचा स्फोट; शेकडो टन मक्याखाली कामगार दबले, चौघांचा मृत्यू
20
पाकिस्तानला मोठा धक्का! चॅम्पियन्स ट्रॉफी घेऊन PoKमध्ये जायचं नाही, ICCने PCBला ठणकावलं!

राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला दणका; हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: June 08, 2020 6:56 PM

काँग्रेस सोडून भाजपामध्ये गेलेल्या आमदारांना विधानसभेत नो एंट्री

गुवाहाटी: काँग्रेसचा हात सोडून भाजपाचं कमळ धरणाऱ्या सात आमदारांना मणिपूर उच्च न्यायालयानं दणका दिला आहे. भाजपामध्ये सामील झालेल्या काँग्रेसच्या आमदारांना पुढील आदेश येईपर्यंत विधानसभेत प्रवेश मिळणार नाही. तसा आदेश न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिला आहे. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीआधी भाजपाला धक्का बसला आहे. मणीपूरमधील राज्यसभेच्या एकमेव जागेसाठी लवकरच निवडणूक होणार आहे.काँग्रेसला रामराम करणाऱ्या आमदारांना अपात्र ठरवण्याची मागणी करणाऱ्या याचिका न्यायालयात दाखल करण्यात आल्या होत्या. उच्च न्यायालयाच्या एक सदस्यीय घटनापीठानं यावर सुनावणी घेतली. या प्रकरणातील पुढील आदेश येईपर्यंत सातही आमदारांना विधानसभेत प्रवेश न देण्याचे आदेश न्यायालयानं विधानसभा अध्यक्षांना दिले. त्यामुळे सनासम बिरा सिंह, गिन्सुअन्हाऊ, क्षेत्रीमयुम बिरा सिंह, पाओनम ब्रोजेन सिंह, ओईनाम लुखोई सिंह, नगमथांग हाओकिप, येंगखोम सूरचंद्र सिंह या सात आमदारांना विधानसभेत जाता येणार नाही. न्यायमूर्ती एन. नोबिन सिंह यांनी याबद्दलचे आदेश दिले. काँग्रेसचे वरिष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी या खटल्यात याचिकाकर्त्यांच्या वकिलांचं नेतृत्त्व केलं. 'काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आलेल्या सात आमदारांनी पक्ष सोडला. त्याविरोधात काँग्रेसनं याचिका दाखल केल्या. ८ नोव्हेंबर २०१८ मध्ये दाखल करण्यात आलेल्या याचिका विधानसभा अध्यक्षांना अद्याप निकाली काढता आलेल्या नाहीत,' असं न्यायमूर्तींनी सुनावणीदरम्यान म्हटलं. अशाच प्रकारची एक याचिका याआधी काँग्रेसचे आमदार मेघचंद्र यांनी दाखल केली होती. मणिपूर सरकारमध्ये मंत्री असलेल्या थोऊनाओजाम शामकुमार यांच्याविरोधात मेघचंद्र सर्वोच्च न्यायालयात गेले होते. न्यायालयानं शामकुमार यांना विधानसभेत प्रवेश न देण्याच्या सूचना केल्या. त्यानंतर विधानसभा अध्यक्षांनी त्यांना अपात्र ठरवलं. शामकुमार २०१७ मध्ये काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले. मात्र आमदारकीची शपथ घेण्यापूर्वीच त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला. भाजपानं त्यांना कॅबिनेट मंत्रिपद दिलं होतं.बलात्कारी पतीची हत्या करणाऱ्या महिलेनं तुरुंगात दिला बाळाला जन्म; कैद्यांना अश्रू अनावरसोनू सूदकडे मदतीची मागणी करणारी ट्विट्स अचानक होऊ लागली डिलीट; नेमकं कारण काय?मोदी-शहांना गुजरातमध्ये आव्हान देतोय मराठमोठा शिलेदार; काँग्रेससाठी बाजीगर ठरणार?'ते' २९ IPS अधिकारी कामचुकार?; डीजीपींच्या लेटरबॉम्बनं पोलीस खात्यात खळबळ

टॅग्स :BJPभाजपाcongressकाँग्रेसRajya Sabhaराज्यसभा