शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यानंतर भारताचा पाकवर कायदेशीर स्ट्राईक; पाकिस्तानची आज बैठक
2
आजचे राशीभविष्य, २४ एप्रिल २०२५: नोकरदारांना आजचा दिवस शुभ आहे
3
जम्मू-काश्मिरात अडकलेल्या पर्यटकांचे पहिले विमान आज मुंबईत येणार; ८३ जणांमध्ये कोणा-कोणाचा समावेश?
4
१५,००० जणांनी कॅन्सल केलं काश्मीरचे विमान तिकीट; पहलगाम हल्ल्यानंतर पर्यटनाचा बेत रद्द
5
Pahalgam Terror Attack: भारत झुकणार नाही, कुणालाही सोडणार नाही; गृहमंत्री अमित शाह यांचा इशारा
6
हादरलेल्या काश्मीरमध्ये आजही महाराष्ट्र, गुजरातचे २०,००० पर्यटक; हॉटेलमध्ये मुक्काम
7
धर्मादाय रुग्णालयांवर आता तपासणी पथकाचा वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश
8
आम्ही आमच्या देशात सुरक्षित आहोत का?; डाेंबिवलीकरांचा संंतप्त सवाल
9
अजूनही पर्यटकांची पहिली पसंती काश्मीरलाच; हल्ल्याचा परिणाम तात्पुरता, सर्व सुरळीत होण्याची आशा
10
‘जशास तसे’ व ‘लक्षात राहील’ असे उत्तर देणे; पाकिस्तानला धडा शिकवावा लागेलच, पण...
11
‘आपल्या’ इतकाच राग, तितकेच दु:ख ‘त्यांना’ही आहे; १९ वेळा दहशतवाद्यांनी मला उचलून नेले
12
स्वीडनमधील हे जोडपं देश सोडून पळालं, मात्र जाताना १५८ पिंप मानवी विष्ठा मागे ठेवले
13
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
14
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
15
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
16
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
17
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
18
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नका, सुप्रीम कोर्टाने केंद्राला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2021 09:14 IST

लवादांतील रिक्त जागांवर नियुक्त्या करा; सर्वोच्च न्यायालयाने केंद्राला सुनावले

ठळक मुद्देसर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविलेल्या कायद्यातील तरतुदीतच पुन्हा सुधारित कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून त्यामुळे हा कायदाच अवैध ठरवावा अशी विनंती काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : देशभरात विविध लवादांमध्ये सदस्यांच्या जागा मोठ्या संख्येने रिक्त असल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी केंद्र सरकारला फटकारले. सरन्यायाधीश एन. व्ही. रामन म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाबद्दलकेंद्र सरकारला अजिबात आदर नाही अशी आमची भावना झाली आहे. केंद्राने आमच्या सहनशक्तीची परीक्षा पाहू नये असा इशाराही सरन्यायाधीशांनी दिला. विविध लवादांमधील रिक्त जागांवर सदस्यांची एक आठवड्याच्या आत नियुक्ती करावी असा आदेश देऊन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे. 

सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरविलेल्या कायद्यातील तरतुदीतच पुन्हा सुधारित कायद्यामध्ये समाविष्ट करण्यात आल्या असून त्यामुळे हा कायदाच अवैध ठरवावा अशी विनंती काँग्रेसचे राज्यसभा खासदार जयराम रमेश यांनी एका याचिकेद्वारे सर्वोच्च न्यायालयाला केली आहे. सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, केंद्र सरकारने लवाद दुरुस्ती कायदा अमलात आणला. लवादाचे अध्यक्ष व सदस्य यांच्या कारकिर्दीची मुदत कमी केली. अगदी अशाच प्रकारचा कायदा सर्वोच्च न्यायालयाने याआधी रद्द केला आहे. आम्ही काही कायदे रद्द करतो व केंद्र सरकार तसेच कायदे पुन्हा बनवते. ही पद्धती आता रुढ होऊ लागली आहे.  नॅशनल कंपनी लॉ ट्रायब्युनल (एनसीएलटी) , नॅशनल कंपनी लॉ ॲपलेट ट्रायब्युनल (एनसीएलएटी) यासारख्या अत्यंत महत्त्वाच्या लवादांमध्ये सदस्यांच्या जागा रिक्त असणे हे अतिशय चिंताजनक आहे. हे लवाद देशाच्या अर्थव्यवस्थेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. लष्करी लवाद व ग्राहक लवादांमध्येही सदस्यांची अनेक पदे रिक्त असल्याने विविध प्रकरणांचा निपटारा करण्यात दिरंगाई होत आहे असेही न्यायालयाने म्हटले आहे. पुढील सुनावणी १३ सप्टेंबरला होणार आहे. 

लवादांना दुर्बल करत आहे केंद्र सरकारnकाही लवादांमधील रिक्त पदे भरण्याबाबत वित्त मंत्रालय येत्या दोन महिन्यांत निर्णय घेईल असे सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी सांगताच त्यावर सरन्यायाधीश एन. व्ही. रामन, न्या. धनंजय चंद्रचूड व न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने तीव्र नाराजी व्यक्त केली. nसर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, ही पदे गेल्या दोन वर्षांपासून रिक्त आहेत. इतक्या दिवसांत केंद्र सरकारने ही पदे का भरली नाहीत. पदे रिकामी ठेवून केंद्र सरकार लवादांना दुर्बल करत आहे.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार