शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: अनेक मतदारसंघांमध्ये उलथापालथ; या क्षणाला कोणी घेतली आघाडी? सर्व अपडेट्स
2
बीडमधून मोठी अपडेट; परळी विधानसभेत धनंजय मुंडे पहिल्या फेरीत आघाडीवर!
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : ३५ मतदारसंघात राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी थेट लढत; कोण मारणार बाजी?
4
माहीममधून मोठी बातमी! अमित ठाकरेंची आघाडी, सदा सरवणकर पिछाडीवर
5
Maharashtra Assembly Election 2024 Result Dahisar Vidhansabha : दहिसरमधून भाजपच्या मनीषा चौधरी आघाडीवर, तिसऱ्यांदा उतरल्यात मैदानात; उबाठाचे विनोद घोसाळकर पिछाडीवर
6
Maharashtra Assembly Election Result 2024: पहिल्या १३० जागांचे कल हाती, महायुती आणि मविआत काटे की टक्कर, भाजपा वरचढ
7
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results: निकालापूर्वीच शरद पवार-उद्धव ठाकरेंचं सावध पाऊल; दगाफटका टाळण्यासाठी महत्त्वाचा निर्णय!
8
पोस्टल मतदानात युगेंद्र पवार आघाडीवर; बारामतीत काय होणार? सर्वांचे लक्ष लागले
9
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 ५१ मतदारसंघात एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरे आमनेसामने; खरी शिवसेना कुणाची जनता ठरवणार
10
पुन्हा २३ नोव्हेंबर! आताही असेच काही घडले तर?
11
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: पत्नी व संतती यांच्याकडून सुखद बातमी मिळेल!
12
'शाका लाका बूम बूम' फेम संजू अडकला लग्नाच्या बेडीत, मराठी पद्धतीने पार पडला विवाहसोहळा
13
...तर आम्हालाही आत्मरक्षणाचा अधिकार; मणिपूरचे मंत्री मैतेई यांनी दिला इशारा
14
सत्तेची दोरी कुणाकडे? अटीतटीच्या लढतीत अस्तित्वाचा लढा कोण जिंकणार?
15
जगभर : ‘चिरतरुण’ होण्यासाठी चरबीचं ‘इंजेक्शन’!
16
यशोमती ठाकुरांचा विजयी चौकार की भाजपाला संधी; तिवसा मतदारसंघात कोण मारणार बाजी?
17
Maharashtra Election Results 2024: नाही जिंकलो तर मिशी काढणार,  समर्थकांनी लावल्या लाखोंच्या पैजा
18
विशेष लेख: ‘प्रोजेक्ट गॅदर’ : एकटेपणावर ‘अमेरिकन’ उपाय
19
अमोल पालेकर नावाच्या ‘थोड्याशा रुमानी’ ‘आक्रिता’ची कहाणी

‘ओरडू नका! ही चौक सभा नाही, न्यायालय आहे’, सरन्यायाधीश चंद्रचूड कुणावर भडकले, नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 6:15 PM

Supreme Court News: सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँडबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा चढला. सोमवारी त्यांनी प्रक्रियेचं योग्ल पालन करणाऱ्या वरिष्ठ वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावले.  

सर्वोच्च न्यायालयामध्ये इलेक्टोरल बाँडबाबतच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांचा पारा चढला. सोमवारी त्यांनी प्रक्रियेचं योग्ल पालन करणाऱ्या वरिष्ठ वकिलांना सरन्यायाधीशांनी खडसावले.  सुरुवातीला ज्येष्ठ विधिज्ञ मुकुल रोहतगी सरन्यायाधीशांच्या कोपाचे शिकार झाले. त्यानंतर ॲडव्होकेट मॅथ्यूज नेदुम्परा यांनी चढ्या आवाजात संभाषण केल्याने सरन्यायाधीश संतापले. सरन्यायाधीशांनी मॅथ्यूज यांना कठोर शब्दात सांगितले की, माझ्यावर ओरडू नका. हे न्यायालय आहे कुठली सभा नाही. त्यानंतर सुप्रीम कोर्ट बार असोसिएशनचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनाही सरन्यायाधीशांच्या कोपाचा प्रसाद मिळाला. या तिन्ही वकिलांची खरडपट्टी काढत कोर्टाने या प्रकरणार आदेश दिला.

आज सर्वोच्च न्यायालयाच्या कामकाजाला सुरुवात झाल्यावर मुकुल रोहतगी यांनी उभे राहून सांगितले की, ते  FICCI आणि ASSOCHAM कडून हजर होत आहेत आणि त्याबाबतचं निवेदन दाखल केलं आहे. त्यावर सरन्यायाधीशांनी सांगितले की, मला असं कुठलंही निवेदन मिळालेलं नाही. त्यानंतर रोहतगी काहीतरी बोलले. त्यावर सरन्याधीश म्हणाले की, तुम्ही निर्णय झाल्यानंतर आला आहात. आता आम्ही तुमचं म्हणणं आताच ऐकू शकत नाही.

मुकुल रोहतगी यांच्यानंतर त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या ॲडव्होकेट मॅथ्यूज नेदुम्परा यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. त्यांनी सांगितलं की, संपूर्ण निर्णय हा नागरिकांना अंधारात ठेवून सुनावण्यात आला. त्यावेळी सरन्यायाधीशांनी त्यांना थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते. तेवढ्यात सरन्यायाधीशांनीही कठोर भाषा वापरण्यास सुरुवात केली. ते म्हणाले की, माझ्यावर ओरडू नका. ही काही कुठली चौक सभा नाही. कोर्ट आहे. जर तुम्हाला निवेदन पुढे आणायचं असेल तर निवेदन दाखल करा. हेच आम्ही मुकुल रोहतगी यांनाी सांगितलं आहे. मात्र सरन्यायाधीशांचं म्हणणं ऐकल्यानंतरही नेदुम्परा गप्प बसले नाहीत. तेव्हा न्यायमूर्ती बी.आर. गवई यांनी तुम्हाला कोर्टाचा अपमान केल्याची नोटिस हवी आहे का? असे परखड शब्दात विचारले.

या दोन वकिलांनंतर व्हिीडओ कॉन्फ्रसिंगच्या माध्यमातून हजर झालेले एसएसीबीएचे अध्यक्ष आदिश अग्रवाल यांनी वादात उडी घेतली. त्यांनी सुओ  मोटो रिह्यूसाठीच्या आपल्या याचिकेला उल्लेख केला. त्यावेळी सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी इशारा देताना सांगितले की, ‘’मिस्टर अग्रवाल, तुम्ही एक वरिष्ठ वकिल आहात, सोबतच एससीबीएचे अध्यक्षही आहात. तुम्हाला प्रक्रिया माहिती असली पाहिजे. तुम्ही मला एक पत्र लिहिलंय, हे सर्व पब्लिसिटीसाठी आहे. आम्ही त्याला परवानगी देणार नाही. त्या मुळे हे कृपया तिथेच ठेवा. नाहीतर मला असं काही सांगावं लागेल जे अप्रीय असेल’’.  

टॅग्स :Supreme Courtसर्वोच्च न्यायालयCourtन्यायालय