विकास झाडे - नवी दिल्ली : कोरोनामुळे देशातील लाखो लोक मृत्युशय्येवर आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी सर्वच राज्य सरकारे कसोशीने प्रयत्न करीत आहेत. परंतु, काही राज्यांना केंद्र सरकारच अडसर ठरत आहे. दिल्लीला कोव्हॅक्सिन द्यायच्या नाहीत अशा सूचनाच कंपनीला मिळाल्यामुळे दिल्लीतील जवळपास १०० लसीकरण केंद्र दिल्ली सरकारला बंद करावी लागली आहेत.एकीकडे साडेसहा कोटी लसी विदेशात वाटणाऱ्या मोदी सरकारने देशातील रुग्णांचा गांभीर्याने विचार केलेला दिसत नाही. १८ वर्षांवरील व्यक्तींचे लसीकरण करण्याचे आदेश केंद्र सरकारने काढले आणि लसीकरणाची जबाबदारी राज्यांवर सोपवली. परंतु, देशातील लोकांना लागणारे कोट्यावधी डोस उपलब्ध करून देण्याचे नियोजन केंद्र सरकारने केले नाही. अनेक राज्यांत लसींचा तुटवडा आहे. १८ वर्षांवरील व्यक्तींना लसीकरण करू शकता हे जाहीर करताना राज्य सरकार कंपन्यांकडे थेट मागणी नोंदवू शकेल, असे केंद्राने सांगितले होते. परंतु, स्थिती अशी आहे की, जोपर्यंत केंद्र सरकार कंपनीला हिंरवा झेंडा दाखवत नाही तोपर्यंत लस राज्यांना पाठविली जात नाही.
दिल्लीला लसी देऊ नका, केंद्राची कंपनीला सूचना!
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 6:41 AM