बांगलादेशातील हिंदू आणि इस्कॉनच्या पुजाऱ्यांविरुद्ध वाढता हिंसाचार पाहता इस्कॉन कोलकाताने हिंदूंना आणि पुजारी यांना एक सल्ला दिला आहे. हिंदूंवरील हल्ल्यांदरम्यान, इस्कॉन कोलकाता ने बांगलादेशातील त्यांच्या संलग्न आणि अनुयायांना टिळक काढून टाकावे आणि तुळशीची जपमाळ लपवावी, भगवे कापड परिधान करणे टाळावे असा सल्ला दिला आहे.
सोलापूरच्या मारकडवाडीत हायव्हॉल्टेज ड्रामा! प्रशासनाच्या दबावामुळे बॅलेट पेपरवरील मतदान थांबवले
हा सल्ला इस्कॉन कोलकाताचे उपाध्यक्ष राधारमण दास यांनी दिला आहे. ते म्हणाले, 'मी सर्व भिक्षू आणि सदस्यांना सल्ला देत आहे की या संकटाच्या काळात त्यांनी स्वतःचे रक्षण करण्यासाठी आणि संघर्ष टाळण्यासाठी अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे. मी त्यांना भगवे कपडे परिधान करणे आणि कपाळावर सिंदूर लावणे टाळावे असे सुचवले आहे.
राधारमण दास म्हणाले, 'जर त्यांना भगवे डोरे घालण्याची गरज वाटत असेल, तर त्यांनी ती कपड्यांमध्ये लपलेली राहील आणि गळ्याभोवती दिसणार नाही अशा प्रकारे घालावी. शक्य असल्यास त्यांनी आपले डोके देखील झाकले पाहिजे. थोडक्यात, त्यांनी भिक्षू म्हणून समोर येऊ नये यासाठी सर्व शक्य उपाय केले पाहिजेत, असंही त्यांनी सांगितले.
चिन्मय दास प्रभू यांच्यासह अनेक पुजाऱ्यांना बांगलादेशमध्ये अटक करण्यात आली आहे. चिन्मय दास यांचे वकील रमन रॉय यांना मारहाण करण्यात आली . त्यांना आयसीयूमध्ये दाखल करावे लागले होते असा दावाही राधारमण दास यांनी केला आहे.
आता याप्रकरणी भाजप नेते दिलीप घोष यांचे वक्तव्यही समोर आले आहे. ते म्हणाले, 'टीएमसी बांगलादेशच्या मुद्द्यावर काय करत आहे? इस्रायलने गाझावर बॉम्ब टाकला की ते काळजीत पडतात आणि शेजारच्या बांगलादेशात अत्याचार होत असताना ते गप्प बसतात. या प्रश्नाचे राजकारण कोण करत आहे? हिंमत असेल तर त्यांनी आंदोलन करावे.
सोमवारी,चिन्मय कृष्ण दास यांच्या सुटकेसाठी न्यायालयात हजर होण्याच्या एक दिवस आधी. इस्कॉनच्या सदस्यांनी अल्बर्ट रोडवरील राधा गोविंदा मंदिरात विशेष प्रार्थना केली.