शहरं
Join us  
Trending Stories
1
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
2
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
3
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
4
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
5
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
6
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
7
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
8
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
9
'उद्धव ठाकरेंना बाहेर काढायचा प्रयत्न काँग्रेस करतंय'; चंद्रशेखर बावनकुळेंचा मोठा दावा
10
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
11
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
12
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
13
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
14
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
15
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
16
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
17
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
18
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
19
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
20
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल

बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडले

By admin | Published: May 07, 2017 1:14 AM

विधिवत पूजेनंतर भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे शनिवारी भाविकांसाठी उघडण्यात आले आणि त्यासोबत वार्षिक पवित्र चारधाम यात्रा पूर्णपणे

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली / देहरादून : विधिवत पूजेनंतर भगवान बद्रीनाथ धामचे दरवाजे शनिवारी भाविकांसाठी उघडण्यात आले आणि त्यासोबत वार्षिक पवित्र चारधाम यात्रा पूर्णपणे सुरू झाली. सकाळी ४ वाजून १५ मिनिटांनी द्वारपूजेनंतर मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले आणि कुबेरासह भगवान ब्रदीविशाल मंदिरात प्रवेशकर्ते झाले. द्वारपूजेसह दरवाजे उघडण्याचा संपूर्ण विधी मुख्य पुजाऱ्याच्या नेतृत्वाखाली झाला. बद्रीनाथ मंदिरात पूजेचे चंदन कर्नाटकहून, केशर काश्मीरहून, तर पूजेचे कापड ईशान्य भागातून आणले जाते. दरवाजे उघडल्यानंतर भाविकांनी मंदिरात प्रवेश करून भगवान बद्रीनाथाचे दर्शन घेतले. चारधाम यात्रेसाठी बद्रीनाथाचे दरवाजे उघडताना लष्कराच्या बँडने धून वाजवली. सहा महिन्यांनंतर बद्रीनाथाचे दरवाजे उघडले तेव्हा दहा हजारांहून अधिक भाविक दर्शनासाठी उपस्थित होते. या सोहळ्यानंतर वार्षिक चारधाम यात्रेला पूर्णपणे प्रारंभ झाला. याच आठवड्यात केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडले होते. हिवाळ्यात सहा महिने बंद राहिल्यानंतर केदारनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी तेथे उपस्थित होते. त्यांनी मंदिरात विधिवत पूजा केली. (वृत्तसंस्था)मुखर्जींनी केली पूजाराष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी शनिवारी बद्रीनाथ मंदिरात मंत्रोच्चारात बद्रीनाथाची पूजा केली. शनिवारी सकाळी बद्रीनाथ मंदिराचे दरवाजे उघडण्यात आले तेव्हा राष्ट्रपती तेथे उपस्थित होते.  यावेळी कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली होती. तत्पूर्वी राष्ट्रपती गुजराती धर्मशाळेत आले.