शहरं
Join us  
Trending Stories
1
काकींना विचारणार, एवढा काय पुळका आलाय त्या नातवाचा?; अजित पवारांचे विधान
2
रवींद्र वायकर यांना मोठा दिलासा, कथित भूखंड घोटाळा प्रकरण अखेर बंद, गैरसमजातून गुन्हा दाखल केला
3
"माझं पहिलं बाळ... पूर्ण भाजलं"; वंशाचा दिवा, आगीने हिरावून नेला, आई-वडिलांचा टाहो
4
झाशी मेडिकल कॉलेजच्या NICU वॉर्डमध्ये भीषण आग, १० मुलांचा होरपळून मृत्यू
5
Maharashtra Election 2024: "सगळीकडं जायचं, फक्त भुंकायचं"; आनंदराव अडसूळांचं नवनीत राणांवर टीकास्त्र
6
प्रियंका गांधींची आज कोल्हापुरात 'महाराष्ट्र स्वाभिमान' सभा, सभेची जय्यत तयारी
7
Mutual Funds नं 'या' १५ स्टॉक्समध्ये केली सर्वाधिक खरेदी, तुमच्याकडे आहेत का?
8
आजचे राशीभविष्य, १६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कुंभसाठी काळजीचा दिवस
9
शरद पवारांच्या उमेदवारांना धाकधूक; आधीच ‘ट्रम्पेट’ची धास्ती, त्यात १६ ठिकाणी नामसाधर्म्य अपक्षांची भर!
10
रिझर्व्ह बँक व्याजदरात कपात करणार की नाही? Moodys नं सांगितला काय आहे देशाचा 'मूड'
11
अश्नीर गोव्हरची Bigg Boss 18 मध्ये एन्ट्री; सलमान खानने 'दोगलापना'वर केली टीका म्हणाला- "तुम्ही जे चुकीचं..."
12
‘एक्स’वर १.१५ लाख युजर्सची फुली; अमेरिकी निवडणुकीत ट्रम्पना पाठिंबा देणे मस्क यांना महागात
13
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा अचानक रद्द; उद्धव ठाकरेंना मैदान मिळण्याची शक्यता
14
प्रवाशांनो लक्ष द्या, रविवारी तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक; असे असेल वेळापत्रक
15
महत्त्वाची बातमी: 'ते' २ दिवस शाळांना सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांनी दिलं स्पष्टीकरण
16
आजचा अग्रलेख: प्रचारातील काय चालेल हो?
17
मलिकांच्या जामीन रद्दच्या त्वरित सुनावणीस नकार
18
मतदारांच्या सोयीसाठी आयोगाचे रंगीत कार्पेट; कशी असेल व्यवस्था? जाणून घ्या...
19
संघ मुख्यालयाच्या अवतीभोवती घरोघरी प्रचारावर भर; मध्य नागपूर मतदारसंघात दटके-शेळके लढतीत पुणेकरांमुळे रंगत
20
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड

Rajasthan Political Crisis: काँग्रेस अजूनही आशावादी; सचिन पायलट यांना बैठकीत सहभागी होण्याचे निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 12:42 PM

सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे.

जयपूर/ नवी दिल्ली - राजस्थानचे उपमुख्यमंत्री आणि प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष सचिन पायलट यांनी बंडाचा झेंडा रोवल्याने सध्या राज्यातील अशोक गहलोत यांच्या नेतृत्वाखालील सरकार संकटात आले आहे. सचिन पायलट हे काँग्रेसचा हात सोडून समर्थक आमदारांसह भाजपामध्ये डेरेदाखल होणार असल्याच्या चर्चांना उत आला आहे. (Rajasthan Political Crisis)

सचिन पायलट यांना मनवण्यासाठी काँग्रेसकडून ऑफर देण्यात आली असल्याचे सांगण्यात येत आहे. काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला म्हणाले की, सचिन पायलट यांच्यासाठी काँग्रेसचे दरवाजे आजूनही खुले आहेत. काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी आणि काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यासोबत सचिन पायलट यांची चर्चा होऊ शकते. त्यामुळे सचिन पायलट यांनी फोन करुन ते बैठकीत कधीपर्यत सहभागी होऊ शकतात हे सांगाव, असं रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. तसेच राजस्थान वैयक्तिक स्पर्धेपेक्षा मोठा असल्याचे रणदीप सुरजेवाला यांनी सांगितले. त्यामुळे सचिन पायलट यांची सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यासोबत पुढे चर्चा होते की नाही, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

सचिन पायलट यांनी ३० आमदारांचा पाठिंबा असल्याचा दावा केला आहे. याचदरम्यान पायलट भाजपा नेत्यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. तर दुसरीकडे सचिन पायलट तिसरी आघाडी बनवू शकतात असंही सांगितलं जात आहे. सूत्रांच्या माहितीनुसार सचिन पायलट यांच्या नवीन पक्षाचं नाव प्रगतिशील मोर्चा अथवा प्रगतिशील काँग्रेस असू शकतं. (Congress)

सचिन पायलट यांची तिसरी आघाडी बनवण्यामागे अनेक महत्त्वाच्या बाजू समोर येत आहेत. सध्याच्या राजकीय परिस्थितीत सचिन पायलट यांचे समर्थन करणाऱ्या आमदारांची संख्या इतकी जास्त नाही जेणेकरुन काँग्रेस सरकार पडेल. अशोक गहलोत वारंवार काँग्रेस आमदार आणि पार्टीच्या नेत्यांच्या संपर्कात आहेत. काँग्रेसने आमदारांना व्हिप जारी केला आहे. ज्यात पक्षाच्या आमदारांना आणि मंत्र्यांना सहभागी व्हावं लागेल. जे या बैठकीला हजर राहणार नाहीत अशांविरोधात कारवाई केली जाऊ शकते. अशा परिस्थिती सचिन पायलट तिसऱ्या आघाडीचा पर्याय स्वीकारु शकतात. 

दरम्यान, सचिन पायलट यांना काँग्रेसच्या ३० आमदारांचे समर्थन मिळाले, जर त्यांना या आमदारांची साथ मिळाली आणि त्यांनी तिसरी आघाडी बनवली तर मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्या सरकारचं नुकसान होऊ शकतं. पण तिसरा गट बनवण्यासाठी त्यांना काँग्रेस पक्षाच्या एक तितृयांश आमदारांचे पाठबळ लागणार आहे. सध्याच्या परिस्थितीत सचिन पायलट यांना ३५-४० आमदारांचे समर्थन लागेल जे आव्हानात्मक असणार आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसSachin Pilotसचिन पायलटRahul Gandhiराहुल गांधीSonia Gandhiसोनिया गांधीBJPभाजपाRajasthanराजस्थान