नवी दिल्ली : बेनामी आर्थिक व्यवहार करणा-यांना कायद्याचा दुहेरी मार सहन करावा लागेल, असा इशारा भारत सरकारच्या कर विभागाने शुक्रवारी दिला. बेनामी मालमत्ता व्यवहार कायद्यानुसार ७ वर्षांपर्यंतची शिक्षा होऊ शकते, याशिवाय प्राप्तिकर कायद्यानुसारही स्वतंत्र कारवाई होईल. प्राप्तिकर विभागाच्या वतीने राष्ट्रीय दैनिकांमधून एक जाहिरात प्रसिद्धीस दिली आहे. यात म्हटले आहे की, बेनामी आर्थिक व्यवहार करू नका. कारण १ नोव्हेंबर २0१६ पासून ‘बेनामी मालमत्ता व्यवहार कायदा-१९८८’ अमलात आला आहे. काळा पैसा बाळगणे हा मानवतेविरुद्धचा गुन्हा आहे. काळा पैसा दूर करण्यास सजग नागरिकांनी सरकारला मदत करावी, असे आवाहन आम्ही करीत आहोत. (लोकमत न्यूज नेटवर्क)>मालमत्तेच्या १0 टक्क्यांपर्यंत दंडखोटी माहिती सादर करणा-यांना ५ वर्षांपर्यंतची शिक्षा आणि मालमत्तेच्या किमतीच्या १0 टक्क्यांपर्यंत दंड होऊ शकतो. बेनामी मालमत्ता सरकारकडून जप्तही केली जाऊ शकते. आयकर कायदा-१९६१ च्या व्यतिरिक्त ही कारवाई असेल. गेल्या वर्षी हा कायदा लागू झाल्यानंतर देशभरात २३0 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत.
बेनामी व्यवहार करणाऱ्यांना दुहेरी तडाखा, सात वर्षांपर्यंत होणार शिक्षा
By admin | Published: March 04, 2017 6:03 AM