ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 10 - कॅशलेस व्यवहारांना चालना देण्यासाठी 30 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भिम अॅप लॉन्च केलं. या अॅपला नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत असून गेल्या 10 दिवसात तब्बल 1 कोटी लोकांनी हे अॅप डाऊनलोड केलं आहे. पंतप्रधान कार्यालयाकडून देण्यात आलेल्या प्रसिद्दी पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
भिम अॅपमुळे पैशांचे व्यवहार अत्यंत सोपे आणि जलदगतीने होत आहेत. त्यामुळे हे अॅप डाउनलोड करण्यास तरूणांचीही पसंती आहे आणि म्हणूनच अॅप तरूणांमध्ये लोकप्रिय झालं असं प्रसिद्दी पत्रकात म्हटलं आहे.
हे अॅप सध्या केवळ अँड्रॉईड स्मार्टफोनसाठीच उपलब्ध आहे मात्र, लवकरच आयफोनसाठी देखील उपलब्ध होणार आहे.
कसं वापरणार भिम अॅप ?
- गूगल प्ले स्टोअरमधून NPCI डेव्हलपर्स असलेलं भिम अॅप डाउनलोड करा.
- प्ले स्टोअरला BHIM सर्च केल्यानंतर खरं अॅप सर्वात वरती असेल
- त्यानंतर तुमची भाषा निवडा
- व्हेरिफिकेशनसाठी फोन नंबर द्या आणि व्हेरिफिकेशनसाठी थोड्यावेळ वाट बघा
- व्हेरिफिकेशननंतर पासवर्ड सेट करा आणि तुमची बॅंक निवडा
- जर तुमच्याकडे यूपीआय नंबर असेल तर मोबाईल नंबरच्या मदतीने माहिती आपोआप घेतली जाईल नसेल तर यूपीआय पिन तयार करा (हा पर्याय अप डाऊनलोड करतानाचा विचारला जातो)
- यासाठी युजर नेमच्या जागी आपला मोबाईल नंबर टाका
- तुमचा मोबाईल नंबर हाच तुमचा पेमेंट अड्रेस असेल
- सेंड, रिक्वेस्ट आणि स्कॅन अॅंड पे, हे तीन पर्याय मेन मेन्यूमध्ये आपल्याला तीन दिसतील
- पैसे पाठवण्यासाठी ज्याला पैसे पाठवायचे आहेत त्याचा यूपीआय नंबर टाकावा
- त्यानंतर किती रक्कम पाठवायची आहे ते टाकावे, नंतर कोणताही रिमार्क टाकावा
- यानंतर आपला यूपीआय पिन टाका आणि रिक्वेस्ट बॅलेन्ससाठी क्लिक करा. यासोबतच तुमचं ट्रान्जेक्शन पूर्ण होईल.