श्रीनगर - जम्मू आणि काश्मीरच्या त्राल येथे सुरक्षा जवानांची दहशतवाद्यांसोबत चकमक झाली असून दोन आतंकवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे. सध्या, या परिसरात सैन्यदलाकडून सर्च ऑपरेशन सुरु आहे. सुरुवातील सुरक्षा रक्षकांनी दहशतवाद्यांना शरणागती पत्कारण्यास सांगितले होते. मात्र, दहशतवाद्यांनी गोळीबार सुरु केल्यानंतर सुरक्षा जवानांनीही प्रत्युत्तरादाखल फायरिंग केलं. त्यामध्ये, दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.
भारतीय सैन्याने काश्मीर खोऱ्यात गेल्या ५ दिवसांता एक डझनपेक्षा अधिक दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. गेल्या ५ दिवसांत सीमारेषेवरुन घुसखोरी करण्याचा प्रयत्न दहशतवाद्यांकडून होत होता. त्यापैकी १३ दहशतवाद्यांचा खात्मा भारतीय सैन्याने केला होता, त्यानंतर आज आणखी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आलं आहे. त्यामुळे एकूण १५ दहशतवाद्यांचा खात्मा गेल्या ५ दिवसांत करण्यात आला आहे. त्यामध्ये मेंढर सेक्टरमध्ये १०, नौशेरा सेक्टरमध्ये ३ दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे. सैन्याने या दहशतवाद्यांकडून २ एके ४७, अमेरिका रायफल, चीनी पिस्टल आणि ग्रेनेड जप्त करण्यात आले आहे.
सोमवारी मनकोट आणि मेंढर सेक्टरमधील चौकीवर पाकिस्तानकडून पुन्हा एकदा गोळीबार करण्यात आला. दहशतवाद्यांना घुसखोरी करण्यासाठी पाकिस्तानी सैन्याने कव्हर फायरिंग केले. मात्र, भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर देत दहशतवादी आणि पाकिस्तानच्या सैन्याचा प्रयत्न हाणून पाडला.