नवी दिल्ली : भारतीय दलित साहित्य अकादमीच्यावतीने दिला जाणारा यंदाचा राष्ट्रीय पुरस्कार वितरण सोहळा बुधवारी पार पडला. यावेळी देशातील समाजसेवक, डॉक्टर, वकील, सिनेकलाकार आणि साहित्यकांना पुरस्कार प्रदान करण्यात आला.
मुंबई येथील सामाजिक कार्यकर्ते उदय सर्वगोड आणि पालघर येथील सामाजिक कार्यकर्ते भाऊराव तायडे यांना यंदाचा डॉ. बाबासाहेब आंबेडकर सेवाश्री राष्ट्रीय पुरस्कार देण्यात आला. तर, डॉ.बाबासाहेब आंबेडकर कलाश्री राष्ट्रीय पुरस्कार नंदकिशोर मसुरकर आणि ग्लोरिया डिसोझा यांना प्रदान करण्यात आले.
भारतीय दलित साहित्य अकादमीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. सोहनपाल सुमनाक्षर, भारतीय दलित साहित्य अकादमीचे ग्रेट ब्रिटनचे राष्ट्रीय अध्यक्ष ओ.पी. आझाद आणि माजी समाजकल्याण बबनराव घोलप यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले.
दरम्यान, भारतीय दलित साहित्य अकादमीच्यावतीने दिल्या जाणाऱ्या या पुरस्कार सोहळ्याचे हे 34 वे वर्ष आहे.