नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. कोरोनाबाधित आणि कोरोनामुळे होणारे मृत्यू दिवसेंदिवस वाढताना पाहायला मिळत आहेत. कोरोनाच्या वाढत्या उद्रेकामुळे कोरोना लस, ऑक्सिजन, रेमडेसिवीर इंजेक्शन, बेड्स यांचा तुटवडा जाणवत आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनावरील नियंत्रणासाठी लस हाच उत्तम पर्याय असून, भारतात ५१ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे. (dr devi shetty says corona vaccination is only way to control coronavirus situation)
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा परिणाम देशावर होतााना पाहायला मिळत आहे. देशाला कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सामना करावा लागू शकतो, असा इशारा तज्ज्ञांकडून दिला जात आहे. अशातच आता कोरोनावर नियंत्रणासाठी तसेच तिसऱ्या लाटेशी लढण्यासाठी कोरोना लस हाच उपाय असून, भारतातील ५१ कोटी नागरिकांचे लसीकरण आवश्यक आहे. हे लसीकरण पुढील दोन ते तीन महिन्यात शक्य असल्याचे मत नारायण हेल्थच्या डॉ. देवी शेट्टी यांनी व्यक्त केले आहे. एका वृत्तवाहिनीशी बोलताना डॉ. शेट्टी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
पुढील १५ दिवसांत राज्यांना १.९२ कोटी लसी मिळणार; केंद्राचा महत्त्वाचा निर्णय
डॉक्टरांवरील ताण कमी करणे गरजेचे
भारतातील कोरोना नियंत्रणावर आणखी काय उपाययोजना करण्यात येतील, याबाबतही डॉ. शेट्टी यांनी सविस्तर भूमिका मांडली. तसेच देशातील डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी यांची संख्या वाढवली पाहिजे. तसेच त्यांच्यावरील ताण कमी करणे गरजेचे आहे, असे डॉ. शेट्टी यांनी नमूद केले. कोरोना रुग्णांची योग्य देखरेख, काळजी यांमुळे तो रुग्ण कोरोनामुक्त होऊन कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी केले जाऊ शकते, असेही डॉ. शेट्टी म्हणाले.
“कोरोनाच्या रुग्णांची सेवा करण्याची परवानगी द्या”; तिहारमधील दहशतवाद्याची याचिका
लसीकरणासाठी ७० हजार कोटींहून कमी खर्च
भारत देश खूप मोठा आहे. भारताची लोकसंख्याही खूप अधिक आहे. असे असूनही आपल्याकडे संसाधने पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. एका दिवसाच्या लॉकडाऊनमुळे १० हजार कोटींचे नुकसान सोसावे लागते. देशातील ५१ कोटी नागरिकांचे प्राधान्याने लसीकरण करणे आवश्यक आहे. आतापर्यंत किमान एक डोस दिलेल्या नागरिकांची संख्या १३ कोटींच्या घरात आहे. या सर्वांचे लसीकरण करण्यासाठी ७० हजार कोटीहून कमी खर्च होऊ शकेल, असेही डॉ. शेट्टी यांनी सांगितले.